आता स्वामींचा मोर्चा आर्थिक सल्लागारांकडे

वृत्तसंस्था
बुधवार, 22 जून 2016

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या हकालपट्टीच्या मागणीची पूर्तता जवळपास पूर्ण झाल्यानंतर आता भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आपला मोर्चा मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांच्याकडे वळविला आहे. अरविंद सुब्रमण्यम यांनी सरकारच्या बौद्धिक संपदा धोरणासह सर्वच धोरणांना वेळोवेळी विरोध केला आहे, त्यामुळे त्यांना पदावरुन काढून टाकण्यात यावे, अशी मागणी स्वामींनी केली आहे.

सुब्रमण्यम स्वामींनी आज (बुधवार) ट्विटरच्या माध्यमातून अरविंद सुब्रह्मण्यम यांना लक्ष्य केले आहे. स्वामी यांनी रघुराम यांच्यावर आरोप करत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. अखेर राजन यांनी दुसरी टर्म स्वीकारण्यास नकार दिली होता. आता स्वामींनी गव्हर्नरपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या अरविंद सुब्रह्मण्यम यांनाही या पदावरून हटविण्याची मागणी केली आहे. 

स्वामी म्हणाले की, मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी आतापर्यंत भारताच्या बौद्धिक संपदा धोरणाला विरोध केला आहे. अमेरिकेचे औषधनिर्मिती क्षेत्रातील हित जोपासण्यासाठी त्यांना भारताविरोधी कारवाई करण्याचा सल्ला कोणी दिला? अरविंद सुब्रह्मण्यम यांची हाकालपट्टी करा.

एका इंग्रजी वृत्तपत्रात 2014 साली आलेल्या वृत्तानुसार, अरविंद सुब्रह्मण्यम यांनी अमेरिकेला जागतिक व्यापारी संघटनेसमोर भारताविरोधात खटला दाखल करण्याचा सल्ला दिला होता. भारतीय औषध कंपन्या क्षुल्लक पेटंट्स तयार करतात आणि सध्या असलेल्या औषधांच्या रचनेत थोडी फेरफार करुन इनोव्हेशनच्या नावाखाली मुदतवाढ मागतात, असे सुब्रह्मण्यम यांनी म्हटले होते. ऑक्टोबर 2014 मध्ये अरविंद सुब्रह्मण्यम यांची मुख्य आर्थिक सल्लागारपदी नेमणूक करण्यात आली होती.

Web Title: subramanian swamy now targets Chief Economic Adviser