'मिठी मारुन विषही देता येते' - स्वामी

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जुलै 2018

अविश्वास प्रस्तावावेळी बोलताना संसदेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. यावरुन, देशभरात उलटसुलट चर्चेला उधाण आले असतानाच भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या गळाभेटीवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांच्या या गळाभेटीवर त्यांनी टीका केली आहे.

नवी दिल्ली- अविश्वास प्रस्तावावेळी बोलताना संसदेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. यावरुन, देशभरात उलटसुलट चर्चेला उधाण आले असतानाच भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या गळाभेटीवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांच्या या गळाभेटीवर त्यांनी टीका केली आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, रशिया आणि उत्तर कोरियामध्ये अशा प्रकरे गळाभेट घेऊन विष दिले जाते. मोदीजींनीही राहुल गांधी यांनी दिलेल्या गळाभेटीनंतर आपली वैद्यकीय चाचणी करुन घ्यायला हवी. त्यांनी तपासून घ्यायला हवे की, गळाभेटीच्या माध्यमातून त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा विषप्रयोग तर झाला नाही. मिठी मारुन विषही देता येते. राहुल गांधी यांचा हा एक विषप्रयोग करण्याचा प्रयत्न असू शकतो.

तसेच, त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता बुद्धू असा उल्लेख करताना म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा बुद्धू लोकांना मिठी मारू देऊ नये असेही त्यांनी सांगितले आहे. एकूणच राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांची संसदेत घेतलेली गळाभेट भाजप खासदारांना रुचलेली नाही.

Web Title: subramhnyan swami citicise on rahul gandhi