यूपीएससीमध्ये राज्यातील 60 हून अधिक जणांना यश

प्रियंवदा म्हडाळकर यूपीएससीमध्ये महाराष्ट्रात पहिली
UPSC
UPSCSakal

नवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०२१ मध्ये झालेल्या मुख्य परिक्षेच्या आज जाहीर झालेल्या निकालात मुलींनी घसघशीत यश मिळविले आहे.. दिल्लीची श्रुती शर्मा देशभरात अव्वल ठरली. तिच्यापाठोपाठ अंकिता अग्रवाल व गामिनी सिंघला यांनी दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. महाराष्ट्रातून प्रियंवदा म्हडाळकर प्रथम (एकूणात १३ वी) तर अंजली श्रोत्रीय (एकूणात ४४ वी) दुस-या क्रमांकावर आहे. या यादीनुसार देशातील एकूण 685 उमेदवारांत राज्यातील 60 हून अधिक जणांचा (सुमारे १० टक्के) समावेश आहे. श्रुती शर्मा हिने जामिया मिलिया इस्लामियाच्या प्रशिक्षण केंद्रात यूपीएससी परीक्षबाबत मार्गदर्शन व तयारी केली. ती सेंट स्टीफन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. ती मूळची उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील रहिवासी आहे.

2021 मध्ये यूपीएससीची लेखी परीक्षा घेण्यात आली. जानेवारी 2022 मध्ये मुख्य परिक्षा झाली व एप्रिल-मे 2022 मध्ये उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 685 उमेदवारांची केंद्र शासकीय सेवेतील विविध पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. या यादीत सर्वसामान्य (ओपन) गटातून –244, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) 73, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून(ओबीसी) – 203, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 105, अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 60 उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 26 दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 126 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट- 63, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- 20, इतर मागास वर्ग -36, अनुसूचित जाती- 07, अनुसूचित जमाती - निरंक उमेदवारांचा समावेश आहे. 80 उमेदवारांची निवड तात्पुरती असेल. एका उमेदवाराचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

राज्यातील गुणवंत

पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील 5 जणांचा समावेश आहे. प्रियंवदा म्हडाळकर (१३) अंजली श्रोत्रीय (44), श्रध्दा गोमे (६०), शुभम अशोक भैसारे (९७), अंकित हिरडे (९८) अशी त्यांची नावे आहेत. या यादीत आणखीही काही उमेदवार असू शकतात. राज्यातील अन्य गुणवंत व त्यांचे क्रमांक असे -,आदित्य काकडे (१२९), शुभम भोसले (१४९), विनय कुमार गाडगे (१५१), ओंकार पवार (१९४), रामेश्वर सब्बनवाड (202), अक्षय वाखरे(२०३), अक्षय महाडिक (२१२), तन्मयी देसाई (२२४), अभिजीत पाटील (२२६), तन्मय काळे, (२३०), विशाल खत्री (236), संचित गुप्ता (237), उत्कर्ष खंडाळ (243), मृदुल शिवहारे (247), इशान टिपणीस (२४८), प्रतीक मंत्री (252) , सुयश कुमार सिंग (262), सोहम मांढरे (२६७).

अश्विन राठोड़ (265), अर्शद मोहम्मद (276), सागर काळे (२८०), रोहन कदम (२९५), रणजित यादव (315) गजानन बाळे (३१९), वैभव काजळे (३२५), अभिजीत पठारे (३३३), राहूल देशमुख (३४९), सुम‍ित रामटेके (३५८), विनायक भोसले (३६६), आदित्य पटले (३७५), स्वप्न‍िल सिसळे (३९५), सायली म्हात्रे (३९८), हर्षल महाजन (४०८), शिवहर मोरे (४०९), चेतन पंढेरे (४१६), स्वप्न‍िल पवार (४१८), पंकज गुजर (४२३), अजिंक्य माने (४२४), ओंकार शिंदे (४३३), रोशन देशमुख (४५१), देवराज पाटील (४६२), अनिकेत कुलकर्णी (४९२), शिल्पा खानिकर (५०६), अस्मर धनविजय (558), नितीश डोमले (५५९), निरज पाटील (५६०), आकांक्षा तामगाडगे (५६२), आशिष पाटील (५६३), शुभम नगराळे (५६८), अमीत शिंदे (५७०), स्वप्न‍िल माने (५७८), प्रशांत डगळे (५८३), अभय सोनारकर (६२०), अश्विन गोलपकर (६२६), मानसी सोनवणे (६२७), अमोल आवटे (६७८), पुजा खेडकर (६७९).

या रिक्त पदांवर उमेदवार होणार रूजू

भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – 72, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 18 इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) –49, अनुसूचित जाती (एस.सी.) – २7, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 14 जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) 37 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 14, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 04, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – 10, अनुसूचित जाती (एस.सी.) – 06, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 03 जागा रिक्त आहेत. भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.) 200 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 83, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 20, इतर मागास प्रवर्गातून - 51, अनुसूचित जाती प्रवर्गातून - 26, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 20 उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ - 242 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - 103, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 23, इतर मागास प्रवर्गातून - 68, अनुसूचित जाती प्रवर्गातून - 31 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून - 17 उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल. केंद्रीय सेवा गट ब - 90 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - 36, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 08 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून - 25, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 15 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 06 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com