#ThursdayMotivation : जिद्दीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात झाला 'तो' IAS

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

दिल्ली युनिव्हर्सिटीमधल्या हंसराज कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेण्यासाठी तो वडिलांसोबत आले होते. कॉलेजमध्ये लागलेल्या गुणवान विद्यार्थ्यांच्या यादीकडे बघून त्यांचे वडील त्याला म्हणाले होते, हिमांशु, एक दिवस या यादीत मला तुझं नाव पाहायचं आहे. पण, ते जेव्हा लागलं त्यावेळी वडील ते पाहायला नव्हते.

नवी दिल्ली : वडील आणि भावाचा आधार गेल्यावरही न हरता जिद्दीने अभ्यास करत हिमांशू नागपाल हे पहिल्याच प्रयत्नात झाला IAS झाले. ही त्यांचीच कहाणी आहे, हरियाणामधल्या एका छोट्याशा गावात शिकून UPSC परीक्षेत त्यांनी यश मिळविले.  हरियाणामधल्या भुनानगरमधून पदवी घेतल्यानंतर ते दिल्लीला आले.

दिल्ली युनिव्हर्सिटीमधल्या हंसराज कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेण्यासाठी तो वडिलांसोबत आले होते. कॉलेजमध्ये लागलेल्या गुणवान विद्यार्थ्यांच्या यादीकडे बघून त्यांचे वडील त्याला म्हणाले होते, हिमांशु, एक दिवस या यादीत मला तुझं नाव पाहायचं आहे. पण, ते जेव्हा लागलं त्यावेळी वडील ते पाहायला नव्हते.

हिमांशुची अ‍ॅडमिशन झाल्यावर त्याचे वडील घरी निघाले होते पण तेव्हाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू ओढवला. या काळात मित्र आणि शिक्षकांनी हिमांशुना धीर दिला. त्याची आई, मोठा भाऊ आणि काकांनी त्याला समजावलं, आयुष्य अजून संपलेलं नाही. हिमांशुने हरियाणामधल्या भुनामधून पाचवीपर्यंत हिंदी माध्यमातूनच शिक्षण घेतलं होतं. 12 वी पर्यंतचं शिक्षणही छोट्या गावात झालेलं. तो कॉलेजला आला तेव्हा त्याला इंग्रजी शब्दांचे उच्चारही करता येत नव्हते. पण मेहनतीच्या जोरावर त्यांनी त्यावरही मात केली.

त्यांना आठवतं, एकदा तर त्याने एमपी आणि एमएलए यामध्ये काय फरक आहे ते विचारलं तेव्हा सगळ्यांनीच त्याची थट्टा केली होती. आता मात्र त्याच व्यवस्थेमधले ते एक वरिष्ठ अधिकारी बनले आहेत. कॉलेजचे दिवस चांगले चालले होते पण त्यातच हिमांशुचे मोठा भाऊही वारले. यावेळेस त्यांना वाटलं, आता आपलं शिक्षण थांबेल, आईकडे पुन्हा जावं लागेल. पण त्याच वेळी त्याचे काका पंकज नागपाल यांनी त्यांना मदत केली. त्याच वेळी त्याने ठरवलं, आपण आयएएस बनायचं.

कुटुंबीयांच्या मदतीने हिमांशुनी शिक्षण पूर्ण केलं आणि आज तो एक यशस्वी आयएएस अधिकारी आहे. हिमांशु काकांविषयी बोलताना म्हणतात की, मला माझ्या आयुष्यात दोन वडील मिळाले. एका वडिलांनी जन्म दिला आणि दुसऱ्या वडिलांनी जीवन दिलं!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success Story of himanshu nagpal in hariyana