शेतकऱ्यांनो वाचा : एक भाऊ एमबीए, एक इंजिनीअर, शेतीतून कमावतात 15 कोटी!

वृत्तसंस्था
सोमवार, 23 डिसेंबर 2019

एक लाख रुपयांची गुंतवणूक करून आम्ही या प्रवासाची सुरुवात केली. पहिल्यांदा आम्ही 5 एकर क्षेत्रावर शेतीचे उत्पन्न घेतले. आज 5 वर्षानंतर आम्ही 22 एकर जमिनीवर फुलकोबी आणि झुच्चिनी याचे उत्पन्न घेत आहोत.

आज 'राष्ट्रीय शेतकरी दिन' देशभरात साजरा केला जात आहे. आपला देश एक कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. पण अलीकडच्या काळात या क्षेत्राकडे तरुण पाठ फिरवू लागले असल्याचे दिसून येत आहे. त्याला अनेक गोष्टी कारणीभूत असल्या तरी काहीजण असेही आहेत, ज्यांनी कृषी क्षेत्रात आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लखनऊ मधील दोन उच्च शिक्षित तरुणांनी शेतीमध्ये करोडोंचे उत्पन्न कसे घेता येते, हे दाखवून दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शशांक आणि अभिषेक भट्ट अशी या तरुणांची नावे आहेत. एमबीएनंतर नोकरी करणारे शशांक आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केलेल्या अभिषेकने कॉर्पोरेट आयुष्याकडे पाठ फिरवली आणि शेती करण्याचा निर्णय घेतला. 2010 मध्ये एमबीए झाल्यानंतर वर्षभरातच मी शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मला माझ्या काकांनी खूप मदत केली. 
२०१० मध्ये एमबीए पूर्ण केल्यानंतर मी २०११ मध्ये शेतीसाठी जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या काकांनी मला याकामी मार्गदर्शन केले, असे शशांक सांगतात. 

Image may contain: 2 people, people smiling, people standing, beard and outdoor

- झारखंडमध्येही पराभव; काय चुकलं भाजपचं?

शेती उत्पादनात भारत जगात दुसर्‍या स्थानी आहे आणि 2018 पर्यंतच्या आकडेवारी नुसार या क्षेत्राने 50 टक्क्यांहून अधिक भारतीयांना रोजगार निर्माण केला आणि जीडीपीमध्ये 17-18 टक्के योगदान दिले. मोठी लोकसंख्या, वाढते शहरीकरण आणि ग्रामीण भागातील जागरूकता यामुळे शेती आणि त्यासंबंधी इतर काही गोष्टींची मागणी वाढण्यास वातावरण निर्मिती होते आहे. 2022 पर्यंत भारत सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि यासाठी अनेक धोरण आखली आहेत. 

5 एकर ते 22 एकर प्रवास

एवढं शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा शेतीकडे वळणे हा खूप धाडसी निर्णय होता. मध्यमवर्गीय कुटुंबात असणारी ही सर्वात मोठी समस्या. मात्र, घरच्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्यानंतर आधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित शेतीविषयी माहिती गोळा करण्यासाठी आम्ही देशभर फिरलो,” शशांक सांगत होता. एक लाख रुपयांची गुंतवणूक करून आम्ही या प्रवासाची सुरुवात केली. पहिल्यांदा आम्ही 5 एकर क्षेत्रावर शेतीचे उत्पन्न घेतले. आज 5 वर्षानंतर आम्ही 22 एकर जमिनीवर फुलकोबी आणि झुच्चिनी याचे उत्पन्न घेत आहोत. 

- झारखंड निकालांवर राजकीय चाणक्य शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणतात..

15 कोटी वार्षिक उत्पन्न

आम्हाला शेतीमधून चांगले रिझल्ट मिळू लागल्यानंतर राज्यभरातून शेतकरी आमची शेती पाहण्यासाठी येऊ लागले. तसेच इस्रायलमधील काही लोकांनीही आमचे कौतुक केले. सुरुवातीला आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, पण काळानुसार गोष्टी बदलत गेल्या. आज आम्ही 15 कोटींपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न घेत आहोत.

Image may contain: plant, flower, outdoor and nature

शेतकऱ्यांनो 'अॅग्रीटेक'कडे वळा

आयबीईएफच्या मते, भारत सरकार शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. 2015-16 साली भारतीय शेतकऱ्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न 96 हजार 703 रुपये होते. ते 2022-23 पर्यंत 2 लाख 19 हजार 724 एवढे करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सिंचन, वेअरहाऊस, कोल्डस्टोरेज यांसारख्या शेतीशी निगडीत सेवांसाठी सरकार वेगवेगळ्या योजना उपलब्ध करत आहे. त्यामुळे देशात अॅग्रीटेक स्टार्टअप संकप्लना जोर धरत आहे. तसेच शेतकऱ्यांनीही आपल्या देशात शेतीशी निगडीत येत असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. 

- आईचं महत्त्व पटवून देणारी नवी मालिका ‘आई कुठे काय करते’

शेतकरी सबलीकरण

शेतकरी हा देशातील सर्वात मोठा मालक आहे. जेव्हा देशातील शेतकरी सर्वांगीणदृष्ट्या सक्षम होईल, तेव्हाच देश सशक्त होईल, असे अभिषेक म्हणतात. 2011 साली शशांक आणि अभिषेक यांनी अॅग्रीप्लास्टची स्थापना केली. ज्याद्वारे शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा, याचे प्रशिक्षण दिले जाते. उत्तर प्रदेशातील प्रत्येक खेड्यात, तालुक्यात आणि जिल्ह्यात एक यशस्वी शेतकरी-उद्योजक निर्माण करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे, असे शशांक सांगतात. ते पुढे म्हणाले, सरकारी अनुदानामुळे पुढे जाण्यास मदत होते, पण जर सरकारने अनुदानात आणखी वाढ केली, तर जास्त प्रमाणात शेतकरी आधुनिक शेतीकडे वळतील, असा विश्वास वाटतो. 

शेतीमध्ये आहे उज्ज्वल भविष्य

आधुनिक शेतीद्वारे आपले उत्पन्न दुप्पट करण्याची संधी दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात आहे, असे मला वाटत नाही. शेती क्षेत्रात तरुणांसाठी खूप संधी आहेत. त्यामुळे त्यांनी शेतीकडे दुर्लक्ष करून शहरातील नोकरीकडे वळण्यापेक्षा आधुनिक शेती करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन शशांक यांनी केले आहे. 

Image may contain: plant and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success story of two highly educated youths who earn crores of income from agriculture