परोपकारी सुधा मूर्तींचा 'हा' व्हिडिओ होतोय व्हायरल

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

या व्हिडिओत सुधा मूर्ती या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सामानाची व्यवस्थित बांधाबांध झाली आहे का हे तपासत आहेत. या पिशव्यांवर इन्फोसिसचे नाव लिहिले आहे, तसेच पूरग्रस्तांना देण्यासाठी आणखी सामानाची बांधबांध सुरू आहे.

बंगळूरू : इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. केरळ राज्यात पूराने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच जगभरातून केरळला मदतीचे हात मिळत आहेत. यातच सुधा मूर्ती यांचा केरळातील कोडागु येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी काही उपयुक्त सामानाचे पॅकींग करतानाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्या स्वतः सर्व काम व्यवस्थित होत आहे ना यावर लक्ष देताना दिसतात. 

या व्हिडिओत सुधा मूर्ती या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सामानाची व्यवस्थित बांधाबांध झाली आहे का हे तपासत आहेत. या पिशव्यांवर इन्फोसिसचे नाव लिहिले आहे, तसेच पूरग्रस्तांना देण्यासाठी आणखी सामानाची बांधबांध सुरू आहे.

भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी 'अम्मा' (आई) असे ट्विट करत सुधा मूर्तींचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांच्या परोपकारी वृत्तीचे दर्शन घडते.    

Web Title: sudha murthy s viral video on help for kerala flood victims