आत्महत्येसाठी आता पंखाही देणार नाही साथ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 मार्च 2017

कोटा येथील वसतिगृहांमध्ये सायरन सेन्सर अन्‌ स्प्रिंग

कोटा: परीक्षेच्या काळात अभ्यासाच्या तणावामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या तशा नवीन नाहीत, मागील काही दिवसांत या आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याने शैक्षणिक क्षेत्रातून चिंता व्यक्त होत होती. कोचिंग क्‍लासेसचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटा शहरामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना रोखण्यासाठी अनोखी शक्कल लढविण्यात आली आहे. आता वसतिगृहांमधील कमी उंचीच्या सीलिंग पंख्यांना सायरन सेन्सर आणि स्प्रिंग बसविण्याचा निर्णय कोटा वसतिगृह मालक संघटनेने घेतला आहे.

सीलिंग पंख्यांना स्प्रिंग बसविण्यात आल्याने त्याला 20 किलोग्रॅंमपेक्षा अधिक वजनाची वस्तू लटकल्यास पंखा आपोआप खाली कोसळेल. तसेच, या पंख्याला सेन्सर यंत्रणा जोडण्यात आल्याने कोणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यास अलार्मही वाजू लागेल. सर्व वसतिगृहांना स्प्रिंग आणि सायरन सेन्सर असलेले पंखे वापरणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे वसतिगृह संघटनेचे अध्यक्ष नवीन मित्तल यांनी सांगितले. गुजरातमधील एका फर्मने ही अनोखी यंत्रणा तयार केली असून पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये ही यंत्रणा आम्हाला मिळेल, असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनीष जैन यांनी नमूद केले. सर्वच वसतिगृहांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती दर्शविणारे मशिन बसविले जाणार असून विद्यार्थी, पालक आणि वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांना देखील त्याचा वापर करणे बंधनकारक असेल. या सर्व मशिन मोबाईल यंत्रणेशी कनेक्‍टेड असतील.

सीसीटीव्हींचाही वापर
महत्त्वाच्या भागांतील 80 ते 90 वसतिगृहांमध्ये बायोमेट्रिक मशिन बसविण्यात आल्या आहेत. सध्या शहरातील पाचशेपेक्षाही अधिक वसतिगृहे संघटनेशी जोडली गेली आहेत. या सर्व वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील, असे जैन यांनी नमूद केले. देशभरातील सव्वा लाखापेक्षाही अधिक विद्यार्थी कोटा येथे दरवर्षी आयआयटी/ जेईई आणि "नीट'च्या तयारीसाठी येतात. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार 2014 मध्ये एकट्या कोटा शहरात 45 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Web Title: suicide and ceiling fan