पाकमध्ये आत्मघातकी हल्ला; 13 ठार, 85 जखमी

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

इस्लामाबाद (पाकिस्तान) - पंजाब विधानसभेबाहेर औषध उत्पादक आणि विक्रेते यांची निदर्शने सुरू असताना झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात सहा पोलिस अधिकाऱ्यांसह 13 जण ठार तर 85 जण जखमी झाले आहेत.

बेकायदेशीररित्या औषध विक्री करणाऱ्यांवर सरकारने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ पंजाब विधानसभेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात औषध उत्पादक आणि विक्रेते जमा झाले होते. यावेळी परसिरात पुरेसा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. यावेळी तेथे आत्मघातकी हल्लेखोराने स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात पंजाबचे पोलिस महानिरीक्षक मुश्‍तक अहमद सुखेरा यांच्यासह अन्य सहा पोलिस अधिकारी मृत्युमुखी पडले.

पाकिस्तानमध्ये तहरिक-ए-तालिबान (टीटीपी) या बंदी असलेल्या संघटनेचा एक घटक असलेल्या जमात-उल-अहरर या समूहाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हल्ला झाला त्यावेळी घटनास्थळी जवळपास 400 पेक्षा अधिक जण असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या घटनेचा निषेध करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानचा दहशतवादाविरुद्धचा लढा निर्णायक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Suicide attack in Pak; 13 killed, 85 injured