सीमा सुरक्षा दलाच्या जवानाची आत्महत्या

वृत्तसंस्था
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

जयपूर - जैसलमेर जिल्ह्यात आज सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने स्वत:ला गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मनोजकुमार असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे, अशी माहिती रामघर पोलिस ठाण्याचे तपास अधिकाऱ्याने सांगितली. या जवानाची तैनाती भारत- पाकिस्तान सीमेवर करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; परंतु डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याबाबत तपास सुरू आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Suicide of BSF jawan