मुलगा न झाल्याने बेळगाव जिल्ह्यात बाळंतिणीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

मांजरी, जि. बेळगाव - मुलगा न झाल्याच्या मानसिकतेतून येथील विवाहितेने बाळंतपणानंतर बाराव्या दिवशी घरातीलच तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (ता. 18) सकाळी मांजरी ही घटना उघडकीस आली. सुप्रिया संजय आंबी (वय 25) असे या महिलेचे नाव आहे.

मांजरी, जि. बेळगाव - मुलगा न झाल्याच्या मानसिकतेतून येथील विवाहितेने बाळंतपणानंतर बाराव्या दिवशी घरातीलच तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (ता. 18) सकाळी मांजरी ही घटना उघडकीस आली. सुप्रिया संजय आंबी (वय 25) असे या महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद अंकली पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस उपनिरिक्षक गणपती कोगनोळे अधिक तपास करत आहेत. 

याबाबत समजलेली माहिती अशी, मांजरी येथील रहिवासी संजय लगमाण्णा आंबी यांचा विवाह तेरा वर्षांपूर्वी भवानीनगर - वाळवा येथील सुप्रिया हिच्याशी झाला होता. पहिली मुलगी झाल्यानंतर बारा वर्षांनंतर पुन्हा मुलगी झाली. त्या मानसिकतेच्या भरातच सुप्रिया हिने घरातील तुळीईला गळफास लावून आत्महत्या केली. सुप्रियाची आई आक्काताई आंबी हिने अंकली पोलिस स्थानकात याबाबत नोंद केली आहे.  

Web Title: suicide incidence in Manjari Belgaum Taluka