सीआरपीएफच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या 

सीआरपीएफच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या 

रायपूर (पीटीआय) : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने बुधवारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. कॉन्स्टेबल कुलदीप सिंह असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव असून, तो सीआरपीएफच्या दुसऱ्या बटालियनमध्ये कार्यरत असून त्याने स्वत:च्या सर्व्हिस रायफलमधून आज सकाळी सुकमाच्या सीआरपीएफच्या मुख्यालयात गोळी झाडून घेतली, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

कॉन्स्टेबल कुलदीप सिंह याच्या सहकाऱ्यांना त्याच्या बराकीतून गोळीचा आवाज आल्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेतली. त्या वेळी तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. कुलदीपला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याला तेथे मृत घोषित करण्यात आले, असे या अधिकाऱ्याने सांगितले. सिंह हा हरियानाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील संतनाली गावातील रहिवासी आहे. या घटनेबद्दल त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com