जवानांवर जेवण करत असतानाच झाला हल्ला

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

नवी दिल्ली- छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान जेवण करत असतानाच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 26 जवान हुतात्मा झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (मंगळवार) दिली.

अधिकाऱयांनी सांगितले की, बस्तर विभागातील कालापत्थर भागात रस्ता तयार करण्याचे काम सुरू होते. रस्ता तयार करणाऱ्या कामगारांना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी जवान पार पाडत होते. जवान जेवण करत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंदपणे गोळीबार केला. यामध्ये 26 जवान हुतात्मा झाले आहेत. यावेळी जवानांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. सहा जवान जखमी झाले आहे.

जखमींपैकी शेर मोहम्मद यांनी जखमी अवस्थेतही नक्षलवाद्यांवर तुटून पडले. दोन-तीन नक्षलवाद्यांच्या छातीत त्यांनी गोळ्या घातल्या. शिवाय, स्वतः जखमी असतानाही त्यांनी जखमी झालेल्या सहकाऱयांना खांद्यावर घेऊन रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गावकऱयांनी नक्षलवाद्यांना मदत केली. गोळीबार करणाऱयांमध्ये महिलाही होत्या, अशीही माहिती पुढे आली आहे.

नक्षलवाद्यांनी हल्ल्यानंतर जवानांकडील 13 एके रायफल, 5 आयएनएसएएस रायफल, 3,420 जिवंत काडतुसे, 22 बुलेटप्रफु जॅकेट्स, 5 वायरलेस सेट, मेटल डिटेक्टरसह अन्य वस्तू घेऊन पसार झाले आहेत.

हुतात्मा झालेले सर्व जवान हे "सीआरपीएफ'च्या 74व्या बटालियनचे आहेत. 2010नंतर नक्षलवाद्यांनी केलेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे. सुकमा जिल्ह्यात 12 मार्च रोजी नक्षलवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात "सीआरपीएफ'चे 12 जवान हुतात्मा झाले होते. तसेच छत्तीसगडमधील दंतेवाड्यात 2010मध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या मोठ्या हल्ल्यात "सीआरपीएफ'चे तब्बल 76 जवान हुतात्मा झाले होते.

Web Title: Sukma attack: CRPF jawans were having lunch when Maoists ambushed them