राहुलजी, पंतप्रधानपदाचा मान राखा : सुमित्रा महाजन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जुलै 2018

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक गळाभेट घेतल्यावरून विविधांगी चर्चा सुरू झाली असली, तरीही लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी मात्र या कृतीवर नाराजी व्यक्त केली. अशा पद्धतीचे वर्तन करून राहुल गांधी यांनी संसदेच्या संकेतांचा भंग केल्याचे स्पष्ट मत महाजन यांनी व्यक्त केले. 

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांची गळाभेट घेतल्यानंतर काँग्रेसने या 'मिठी'चे कौतुक करायला सुरवात केली होती. गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या भाषणादरम्यान विरोधी पक्षांनी गदारोळ घातला. त्यामुळे कामकाज काही वेळासाठी तहकूब करावे लागले. 

कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहुल-मोदी गळाभेटीविषयी काही वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला. यावर महाजन यांनी आक्षेप घेतला आणि राहुल यांच्या एकूणच वर्तनाविषयी नाराजी व्यक्त केली. यादरम्यान महाजन यांनी राहुल यांनी घेतलेली गळाभेट आणि त्यानंतर जागेवरा बसून मारलेला डोळा यावर भाष्य केले. 

'कुणीही कुणाचीही गळाभेट घेण्याला मी विरोध कशाला करू? कामकाज संपल्यानंतर तुम्हीही एकमेकांना भेटत असताच! पण पंतप्रधान जेव्हा त्या खुर्चीवर बसलेले असतात, तेव्हा ते 'नरेंद्र मोदी' नसतात, तर देशाचे पंतप्रधान असतात. याचे भान सर्वांनीच राखायला हवे. पंतप्रधान खुर्चीवर बसलेले असताना अशाप्रकारे वर्तन करणे चुकीचे आहे. राहुल गांधींनी भाषण संपविले, त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्याजवळ गेले आणि पुन्हा जागेवर येऊन भाषण सुरू केले. हे वर्तन अयोग्य आहे', असे महाजन यांनी काँग्रेसला सुनावले. 

Web Title: Sumitra Mahajan expressed displeasure over Rahul Gandhi's behaviour