#MeToo अकबर यांच्यावर आरोप करणाऱ्या रामाणींना समन्स

#MeToo अकबर यांच्यावर आरोप करणाऱ्या रामाणींना समन्स

नवी दिल्ली : #MeToo प्रकरणात पत्रकार प्रिया रामाणी यांनी माजी केंद्रीयमंत्री एम. जे. अकबर यांचे नाव घेतले होते. रामाणी यांच्या आरोपानंतर देशभरात #MeToo मोहीम सुरु करण्यात आली. या आरोपानंतर अकबर यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता अकबर यांच्या बदनामीप्रकरणी दिल्ली न्यायालयाने रामाणी यांना समन्स बजावले आहे.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात #MeToo या लैंगिक शोषणविरोधी मोहीमेंतर्गंत अकबर यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप रामाणी यांनी केला होता. रामाणी यांच्या आरोपानंतर अनेक महिलांनी अकबर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या प्रकरणानंतर अकबर यांच्यावर विविध स्तरावरून टीकेची झोड उठवण्यात आली. या टीकेनंतर अकबर यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी समर विशाल यांनी रामाणी यांना 25 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहावे, असे आदेश दिले आहेत. याशिवाय रामाणी उच्च न्यायालयात समन्सविरोधात दाद मागू शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. 

दरम्यान, माझ्यावर करण्यात आलेले आरोप अत्यंत चुकीचे व घाणेरडे आहेत. या आरोपांमुळे माझे नुकसान झाले, असे अकबर यांनी 31 ऑक्टोबरला न्यायालयात सांगितले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com