पर्याय शोधण्याचा प्रश्‍न कायमच

sunandan lele article write about indian cricket
sunandan lele article write about indian cricket

लीड्‌स- इंग्लंड दौऱ्याला सुरवात होत असताना गेल्या दौऱ्यांमधील अपयश पुसून काढायचे हे जसे एक ध्येय भारतीय संघासमोर होते, तसेच पुढील वर्षी इंग्लंडमधे होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेच्या तयारीचे उद्दिष्ट होते. फलंदाजी आणि गोलंदाजीतील उणिवा कशा भरून निघतील. समर्थ पर्याय कसे शोधता येतील, याची आखणी भारतीय संघ व्यवस्थापनाला करायची होती. इंग्लंडसमोर झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून हे उद्दिष्ट साध्य झाले, असे नक्कीच म्हणता येणार नाही. 

शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे तीन फलंदाज भक्कम वाटत असताना मधल्या फळीतल्या दोन जागांवर नक्की कोण हक्क प्रस्थापित करणार, याचा शोध घ्यायचा होता. संघ व्यवस्थापनाने लोकेश राहुल, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, अजिंक्‍य रहाणे सगळ्यांना आलटून पालटून संधी दिली. दुर्दैवाने कोणीही सातत्यपूर्ण खेळ करून जागा नक्की केली, असे म्हणता येणार नाही. अजूनही एकदिवसीय सामन्यात चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करायला शंभर टक्के लायक फलंदाज कोण, याचा अंदाज आलेला नाही. खेळाडूंच्या निवडीबाबतचे संघ व्यवस्थापनाचे काही निर्णय समजण्यापलीकडचे होते, असेच म्हणावे लागेल. 

भारतीय गोलंदाजी दुसऱ्या सामन्यात निष्प्रभ ठरली, हा चिंतेचा विषय आहे. संघ जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्‍वर कुमारवर एकदिवसीय सामन्यातील यशाकरिता किती अवलंबून आहे, हे दिसून आले. कसोटी संघात वेगवान गोलंदाजांच्या जागेकरिता समर्थ पर्याय आहेत. एकदिवसीय संघाचे तसे म्हणता येणार नाही. लगेच टीका करणे बरोबर नाही, पण सिद्धार्थ कौलसारखे स्थानिक क्रिकेटमधे चमक दाखवणारे गोलंदाज आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरेसे पडत नाहीयेत, हेच प्रकर्षाने आतापर्यंत या दौऱ्यात दिसून आले आहे. 

एकदिवसीय मालिका झाल्यानंतर आता कसोटी मालिकेपूर्वी मोठी विश्रांती मिळणार आहे. झटपट सामन्यांपुरतेच निवडलेले खेळाडू मायदेशी परततील, कसोटीसाठी निवडलेले खेळाडू इंग्लंडमध्ये येतील. तोपर्यंत वेळ जाणार आहे. या कालावधीत संघात कायम राहिलेले खेळाडू सुटीची मजा घेतील. त्यानंतर 23 ऑगस्टपासून खेळाडू एकत्र सराव करतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com