लोकसभा निवडणुका होणार 'या' आयुक्तांच्या नेतृत्वाखाली

वृत्तसंस्था
रविवार, 2 डिसेंबर 2018

अरोरा यांनी मावळते आयुक्त ओमप्रकाश रावत यांच्याकडून अधिकृतरीत्या पदभार स्वीकारला. आगामी सार्वत्रिक निवडणूक त्यांच्याच देखरेखीखाली होणार आहे. अरोरा हे 1980 च्या बॅचचे राजस्थान केडरमधील अधिकारी असून त्यांनी वित्त, वस्रोद्योग मंत्रालयाबरोबरच नियोजन आयोगात देखील महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. 

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुनील अरोरा यांनी आज (रविवार) पदभार स्वीकारला. यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक होणार आहे. 

अरोरा यांच्या नियुक्तीसंदर्भात नुकतीच अधिकृत अधिसूचना जारी करण्यात होती. अरोरा यांच्या नावावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले होते. त्यांचे नाव राष्ट्रपती भवनाकडेही पाठविण्यात आले होते. 

अरोरा यांनी मावळते आयुक्त ओमप्रकाश रावत यांच्याकडून अधिकृतरीत्या पदभार स्वीकारला. आगामी सार्वत्रिक निवडणूक त्यांच्याच देखरेखीखाली होणार आहे. अरोरा हे 1980 च्या बॅचचे राजस्थान केडरमधील अधिकारी असून त्यांनी वित्त, वस्रोद्योग मंत्रालयाबरोबरच नियोजन आयोगात देखील महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. 

Web Title: Sunil Arora takes charge as the new Chief Election Commissioner of India