नेताजी, 'सायकल' नाही मिळाली तर 'हे' चिन्ह घ्या

वृत्तसंस्था
रविवार, 15 जानेवारी 2017

लखनौ : समाजवादी पक्षातील दोन्ही गटांनी "सायकल' चिन्हावर आपला दावा केला असून, त्याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने राखून ठेवला आहे. या वादामुळे जर निवडणूक आयोगाने सपाचे चिन्ह गोठविण्याचा निर्णय घेतला, तर सपाने आपल्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा पर्याय आपण मुलायम सिंग यादव यांच्यापुढे ठेवल्याची माहिती लोकदालाचे नेते सुनील सिंग यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सुनील सिंग म्हणाले, की ज्येष्ठ नेते चरणसिंग यांनी 1980 मध्ये लोकदलाची स्थापना केली होती. त्या वेळी मुलायम सिंग यादव हे त्यांच्याबरोबर होते. आपल्या पक्षाला निवडणूक आयोगाने बेकायदा ठरविले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे सायकल चिन्ह निवडणूक आयोगाने गोठविले, तर त्यांनी आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी.

"बियाणे लावताना शेतकरी' हे लोकदलाचे निवडणूक चिन्ह आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मुलायमसिंग यादव यांच्यातील वाद संपविण्यासाठी मी प्रयत्न करीत त्यांचा वाद संपला नाही आणि हे चिन्ह अखिलेश यादव यांच्याकडे गेले किंवा निवडणूक आयोगाने ते गोठविलेच, तर मुलायम सिंग यांनी आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढावे, असे आपण त्यांना सांगितल्याचे सुनील सिंग यांनी सांगितले.

Web Title: sunil singh offers lokdal's symbol to mulayam singh