अरोरा यांनी स्वीकारली मुख्य निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 3 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : निवडणूक आयुक्त सुनीलकुमार अरोरा यांनी आज देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. ओ. पी. रावत हे काल (1 डिसेंबर) पदावरून निवृत्त झाले होते. अरोरा यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल. त्यांच्यावर 2019 ची लोकसभा निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी राहील. 

नवी दिल्ली : निवडणूक आयुक्त सुनीलकुमार अरोरा यांनी आज देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. ओ. पी. रावत हे काल (1 डिसेंबर) पदावरून निवृत्त झाले होते. अरोरा यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल. त्यांच्यावर 2019 ची लोकसभा निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी राहील. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निवडणूक आयोगातील सर्वांत ज्येष्ठ निवडणूक आयुक्त सुनीलकुमार अरोरा यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केल्याचे कायदा मंत्रालयाने गेल्या आठवड्यात काढलेल्या अधिसूचनेत म्हटले होते. भारतीय प्रशासकीय सेवेतील 1980च्या तुकडीतील आणि राजस्थान केडरचे अधिकारी असलेले अरोरा यांची 31 ऑगस्ट 2017 रोजी निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण सचिव, कौशल्य विकास सचिवपदही सांभाळले. त्याआधी 1993 ते 1998 पर्यंत राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि 2005 ते 2008 दरम्यान मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिवही होते. 

लोकसभा निवडणुकीव्यतिरिक्त ओडिशा, महाराष्ट्र, हरियाना, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम यांखेरीज अलीकडेच भंग झालेल्या जम्मू आणि काश्‍मीर या विधानसभांच्या निवडणुकादेखील 2019 मध्ये होतील. तत्पूर्वी, सध्या सुरू असलेल्या आणि लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगण या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील गृहराज्य राजस्थान आणि तेलंगण या दोन राज्यांचे मतदान बाकी आहे. तर, 11 डिसेंबरला या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.

दरम्यान, मध्य प्रदेशात मतदानानंतर ज्याप्रकारे इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या देखरेखीवरून वाद सुरू आहे. तो पाहता ईव्हीएमच्या वादंगानेच सुनीलकुमार अरोरा यांचे स्वागत होण्याची चिन्हे आहेत. 

Web Title: Sunilkumar Arora taken Charge as Chief Election Commissioner