अयोध्येतील पाच एकर जागेवर मशिदीसोबत 'या' इमारतीही उभारणार : सुन्नी वक्फ बोर्ड

वृत्तसंस्था
Monday, 24 February 2020

अयोध्यापासून सुमारे २० किमी अंतरावर हा भूखंड आहे. धन्नीपूर गाव मुस्लिमबहुल मानले जाते. या परिसरात सुमारे २० मशिदी आहेत.

लखनौ : अयोध्या प्रकरणातील निकालानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मशीद बांधण्यासाठी देण्यात आलेल्या पाच एकर भूखंडावर उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने तयारी दर्शविली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तसेच या भूखंडावर मशीदीबरोबर इंडो-इस्लामिक संशोधन केंद्र, एक रुग्णालय आणि एक ग्रंथालय तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (ता.२४) वक्फ बोर्डाच्या सदस्यांच्या बैठकीनंतर मंडळाचे अध्यक्ष झफर अहमद फारुकी यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली. 

- 'कलम ३७०'ला विरोध करणाऱ्या महाथीर मोहंमद यांचा राजीनामा

झफर अहमद फारुकी याविषयी माहिती देताना म्हणाले की, सर्वांत आधी मशीद बांधण्यासाठी एक ट्रस्ट स्थापन केला जाणार आहे. या ट्रस्टमार्फत मशीद आणि भारत-इस्लामिक सभ्यतेचे प्रदर्शन करण्यासाठी एक संशोधन केंद्र, एक सेवाभावी रुग्णालय आणि एक सार्वजनिक ग्रंथालय तयार करेल. हे फक्त वाटप केलेल्या जागेवर केले जाईल.

- दिल्लीतील निदर्शने जाणीवपूर्वक? ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे हिंसाचार घडविल्याची शक्यता!

तथापि, या ट्रस्टचे सदस्य कोण असतील, याची घोषणा नंतर केली जाईल, असेही त्यांनी या वेळी नमूद केले. दरम्यान, वक्फ बोर्डाच्या सदस्यांच्या या बैठकीस आठपैकी सहा सदस्य उपस्थित होते, तर दोन सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला होता, असे त्यांनी या वेळी सांगितले. 

- 'कलम ३७०'ला विरोध करणाऱ्या महाथीर मोहंमद यांचा राजीनामा

अयोध्यापासून २० किमी अंतरावर भूखंड 

उत्तर प्रदेश सरकारने ५ फेब्रुवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर अयोध्येच्या रौनाही येथील सोहावल परिसरातील धन्नीपूर गावात असलेली पाच एकर जागा मशिदीसाठी वाटप केली आहे. अयोध्यापासून सुमारे २० किमी अंतरावर हा भूखंड आहे. धन्नीपूर गाव मुस्लिमबहुल मानले जाते. या परिसरात सुमारे २० मशिदी आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunni Waqf Board accepts 5 acre land near Ayodhya to build mosque and Hospital