लग्न झाले अन् दोन दिवसांतच...

वृत्तसंस्था
Tuesday, 30 June 2020

दिल्लीहून घरी आला होता नवरदेव

- फोटोग्राफरसह फळे विक्रेत्यालाही कोरोना

पटना : कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बिहारमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 हजारांवर पोहोचली आहे. कोरोनाने बिहारमध्ये थैमान घातले आहे. त्यानंतर आता पटना येथे झालेल्या विवाहसोहळ्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला.   

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पटना पालीगंजचे अनेक गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पालीगंजमध्ये एक विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. हा विवाहसोहळाही संपन्न झाला. त्यानंतर आता या नवरदेवाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 15 दिवसानंतर आता या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित असलेले काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पाहिला मिळत आहे. आत्तापर्यंत 100 पेक्षा अधिक पाहुण्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. 

marriage ceremony

350 लोकांचे नुमने

या प्रकरणी 300 पेक्षा जास्त जणांचे स्वॅब तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यांचे हे नमुने तीन-चार दिवसांपूर्वीच घेण्यात आले. मात्र, यातील अनेकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये वरातीत सामील झालेले काही लोकांसह इतर नातेवाईकांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत.

फोटोग्राफरसह फळे विक्रेत्यालाही कोरोना

या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या फोटोग्राफर, किराणा आणि फळेभाजी विक्रेत्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाशिवाय वैद्यकीय पथकाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही परिसर सील

पालीगंज बीडीओ चिरंजीवी पांडेय यांच्या सूचनेनुसार, या परिसरातील बाबा बोरिंग रोड, मीठा कुवा, डीहपालीसह इतर ठिकाणी बॅरिकेड्स टाकून सील करण्यात आला आहे. त्यानंतर लाऊड स्पीकरच्या माध्यमातून विनाकारण बाहेर पडू नका, अशाप्रकारच्या सूचनाही देण्यात आल्या. 

जून महिन्यात लग्न

डीहपाली गावात राहणाऱ्या एका तरुणाचा विवाह 15 जूनला झाला होता. हा तरुण दिल्लीहून आपल्या घरी कारने आला होता. एका खासगी कंपनीत हा तरुण इंजिनिअर होता. जेव्हा हा तरूण घरी आला तेव्हा बिहारमधील क्वारंटाईन सेंटर बंद झाले होते. त्यामुळे त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले होते.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Super spreader wedding near Patna leaves 79 infected with coronavirus