युवा निर्माते, दिग्दर्शकांना उत्तेजन - वेंकय्या नायडू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

पणजी - आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून भारतातील प्रादेशिक सिनेमा जागतिक होत असून युवा निर्माते, दिग्दर्शकांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न पॅनोरमातून सुरू झाले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री वेंकय्या नायडू यांनी आज केले.

"इफ्फी'तील 26 पूर्ण स्वरूपी व 21 लघुपट, माहितीपटांचा समावेश असलेल्या इंडियन पॅनोरमा विभागाचे आयनॉक्‍स थिएटर दोनमध्ये उद्‌घाटन केल्यानंतर ते बोलत होते. इंडियन पॅनोरमाच्या उद्‌घाटनाला मोठी गर्दी होती. भारतात सिनेमाच्या माध्यमातून कथा सांगणारे, कलात्मकतेने विषय मांडणारे कमी नाही, सिनेमातील सर्जनशीलतेची शक्ती म्हणजे इंडियन पॅनोरमा होय, असे नायडू यांनी पुढे बोलताना नमूद केले. देशातील नवीन चित्रपटांचा सहभाग असावा, यासाठी इंडियन पॅनोरमात यंदा सेन्सॉर न झालेल्या चित्रपटांना संधी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली. "इमा साबित्री' हा लघुपट व "इश्‍टी' हा संस्कृत चित्रपट उद्‌घाटनाच्या वेळी दाखवण्यात आला.

Web Title: support to director & producer