नोटाबंदीच्या निर्णयाला 'फॅशन शो'द्वारे पाठिंबा!

वृत्तसंस्था
शनिवार, 3 डिसेंबर 2016

सूरत (गुजरात) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात येत आहे. सूरतमध्ये बंदी घातलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटांचे डिझाईन असलेल्या कपड्यांचा फॅशन शो आयोजित करून या निर्णयाचे स्वागत करत अनोख्या पद्धतीने पाठिंबा दर्शविण्यात आला आहे.

चलनातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आजही एटीएममध्ये रांगा दिसत असून अद्याप बॅंकेतही गर्दी दिसून येत आहे. मात्र तरीही नागरिक हा निर्णय योग्य असल्याचे म्हणत आहेत. सूरतमधील एका महाविद्यालयात 500 आणि 1000 रुपयांच्या रद्द करण्यात आलेल्या नोटांची डिझाईन असलेल्या कपडे परिधान करून आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी रॅम्प वॉक करणाऱ्यांनी हातामध्ये रद्द केलेल्या नोटाही घेतल्या होत्या. तसेच रॅम्प वॉक पूर्ण झाल्यावर रॅम्परवच ठेवलेल्या एका कचऱ्याच्या डब्यात या नोटा सहभागी विद्यार्थी-विद्यार्थींनी टाकून देत होते. अशा प्रकारे मोदींच्या निर्णयाचे स्वागत करत त्याला पाठिंबा देण्यात आला.

Web Title: Supprt for Currency Ban from Fashion Show