निकाह हलालाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात 

पीटीआय
मंगळवार, 3 जुलै 2018

मुस्लिम समाजातील निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व या प्रथांना आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करून घेण्यासंबंधी विचार करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने आज दर्शविली. 

नवी दिल्ली : मुस्लिम समाजातील निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व या प्रथांना आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करून घेण्यासंबंधी विचार करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने आज दर्शविली. 

सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायाधीश ए. एम. खानविलकर तसेच न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने ज्येष्ठ वकील व्ही. शेखर यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यासाठी सर्व याचिका पाच न्यायाधीशांच्या घटनात्मक पीठासमोर दाखल करण्यास सांगितले. आम्ही यामध्ये लक्ष घालू, असेही खंडपीठाने म्हटले आहे. 

दिल्लीतील याचिकाकर्त्यांपैकी एक समीना बेगम यांच्या वतीने उपस्थित वकील शेखर आणि अश्‍विनी उपाध्याय यांनी सांगितले, की समीना यांना याचिका मागे घेण्यासाठी धमकी दिली जात आहे. 

दरम्यान, खंडपीठाने केंद्राच्या वतीने उपस्थित अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना या याचिकेवर उत्तर दाखल करण्याची परवानगी दिली.

Web Title: Supreme Court agrees to consider urgent listing of pleas against nikah halala polygamy