सीबीआयच्या संचालकांना एका रात्रीतच का हटवले?; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) सुरु असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारला खडबोल सुनावले. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांचे अधिकार तातडीने काढून घेतले आणि त्यांना रजेवर पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. सीबीआयच्या संचालकांना एका रात्रीतच का हटवले?, असा सवालही न्यायालयाने केला.  

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि त्यांच्यानंतर सीबीआयचे वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक असलेले अधिकारी राकेश अस्थाना यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. केंद्र सरकारने तातडीने कारवाई करून आलोक वर्मा यांचे अधिकार काढून घेत त्यांना रजेवर पाठवले होते. त्यानंतर आज झालेल्या या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्राला सुनावले आहे. तसेच केंद्रामार्फत करण्यात आलेल्या या कारवाईवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सरन्यायाधीश म्हणाले, "सीबीआयमधील या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील वाद हा काही एका दिवसात सुरू झालेला नसेल. मग सरकारने आलोक वर्मा यांचे अधिकार निवड समितीचा सल्ला न घेता अचानक कसे काय काढून घेतले ?''

Web Title: Supreme Court asked the Centre to explain its midnight action against CBI chief Alok Verma.