कर्नाटकातील बंडखोर आमदारांना अध्यक्षांपुढे हजर राहण्याचे आदेश

karnataka
karnataka

नवी दिल्ली : कर्नाटकातील सत्तानाट्याचे नाट्य अजूनही सुरुच असून, काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) 10 बंडखोर आमदारांना आज सायंकाळी सहापर्यंत विधानसभा अध्यक्षांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत ठाण मांडून बसलेल्या काँग्रेस आणि (जेडीएस) बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे चाणक्‍य डी. के. शिवकुमार यांचा दुसरा प्रयत्नही निष्फळ ठरला होता. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या आमदारांना सुरक्षा पुरविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या आमदारांनी आज सायंकाळी सहापर्यंत विधानसभा अध्यक्षांपुढे हजर राहण्यास सांगितले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आमदार आज मुंबईहून बंगळूरला येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार के. सुधाकर आणि एम. टी. बी. नागराज यांनी आज राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनीही आपण तत्काळ हे राजीनामे स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले होते. विधानसभा अध्यक्षांनी आपले राजीनामे तत्काळ स्वीकारावेत म्हणून बंडखोरांनी त्यांच्यावर कायदेशीर मार्गाने दबाव आणायला सुरवात केली आहे. यासाठी आज या सर्व आमदारांनी थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com