दिल्लीत प्रदूषणामुळे फटाक्‍यांना बंदी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली- दिल्लीत धोकादायक पातळी ओलांडलेल्या प्रदूषणाला आळा बसण्यासाठी येथे फटाक्‍यांवर बंदी घालण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) हा निर्णय दिला.

यंदा दिवाळीनंतरच्या काळात राजधानी प्रदूषणाच्या धुक्‍याने काळवंडली होती. त्या वेळी येथील प्रदूषणाची पातळी नेहमीपेक्षा 17 पटीने अधिक होती. "स्मॉग'मुळे दिल्लीकरांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. या स्थितीची तुलना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी "गॅस चेंबर'शी केली होती.

दिल्लीत प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर झाल्याने याची दखल घेत न्यायालयाने फटाके विकण्यावर बंदी घातली आहे. त्यानुसार सर्व फटाके विक्रत्यांचे परवाने बेमुदत काळासाठी निलंबित करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत फटाक्‍यांवरील बंदी लागू राहील.

Web Title: Supreme Court bans sale of firecrackers in Delhi