सर्वोच्च न्यायालयाचा आसारामला दणका; याचिका फेटाळली

आसुमम थाउमल हरपलानी उर्फ ​​आसाराम अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यामुळे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. इतकेच नाही तर बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या आसारामवर मादक पदार्थ आणि हत्येसारखे अनेक गंभीर आरोप आहेत.
asaram-bapu
asaram-bapuFile photo
Summary

आसुमम थाउमल हरपलानी उर्फ ​​आसाराम अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यामुळे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. इतकेच नाही तर बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या आसारामवर मादक पदार्थ आणि हत्येसारखे अनेक गंभीर आरोप आहेत.

नवी दिल्ली : लैंगिक अत्याचारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आसारामला अंतरिम जामीन मंजूर करण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे आसारामच्या प्रकृतीकडे पाहता उपचारासाठी आयुर्वेदिक संस्थेत पाठविण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. आसारामला ऋषिकेशमधील आयुर्वेदिक रुग्णालयात दाखल करावे, या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान सरकारला नोटीस बजावली आहे. (Supreme Court declines interim bail to asaram bapu)

सर्वोच्च न्यायालयाअगोदर राजस्थान उच्च न्यायालयानेही आसाराम बापूला अंतरिम जामीन नाकारला होता. आसारामने तब्येत ठीक नसल्याचे कारण देत राजस्थान उच्च न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अपील केले होते. यापूर्वी राजस्थान उच्च न्यायालयाने आसाराम बापूच्या सर्व आरोग्य नोंदींचा अहवाल उपलब्ध करून देण्याचे आदेश त्याचा मुलगा नारायण साईना दिले होते.

asaram-bapu
P-75I, भारतातच बनणार रडारला चकवा देणाऱ्या सहा पाणबुडया

नारायण साईने वडिलांच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी परवानगी मिळावी, यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अरुण भन्साळी यांच्या खंडपीठाने संबंधित तुरूंग प्रशासनाला आदेश देत म्हटले होते की, आसारामच्या सर्व वैद्यकीय नोंदी दोन दिवसात उपलब्ध करुन देण्यात याव्यात. या प्रकरणी पुढील सुनावणी ७ जूनला होणार आहे.

asaram-bapu
लोकसभेत ४२० क्रमांकाचे आसन का नाकारले जाते?

बलात्कार प्रकरणात आसारामला जन्मठेपेची शिक्षा

आसुमम थाउमल हरपलानी उर्फ ​​आसाराम अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यामुळे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. इतकेच नाही तर बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या आसारामवर मादक पदार्थ आणि हत्येसारखे अनेक गंभीर आरोप आहेत. एक काळ असा होता की, जेव्हा देशातील अनेक नामांकित व्यक्ती आसारामच्या दरबारात हजेरी लावत असत, पण २०१३मध्ये बलात्काराच्या प्रकरणात अडकल्यानंतर त्याचे वाईट दिवस सुरू झाले आणि तेव्हापासून आसाराम तुरूंगात आहे.

(Edited by : Ashish N. Kadam)

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com