सीबीएसई पेपरफुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्या

वृत्तसंस्था
बुधवार, 4 एप्रिल 2018

दहावीच्या गणित विषयाची फेरपरीक्षा घेतली जाणार नाही कारण, हे पेपर तपासल्यानंतर पेपरफुटीचा कोणताही प्रभाव या उत्तरांमध्ये दिसत नाही. त्यामुळे सीबीएसई बोर्डाने दहावीची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय रद्द केला.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसई पेपरफुटी प्रकरणातील सर्व याचिका फेटाळल्या आहेत. आम्ही कोणत्याही शैक्षणिक बोर्डाच्या फेरपरिक्षा घेण्याबाबतच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.  

 CBSE

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा गणित व बारावीचा अर्थशास्त्र या विषयांचे पेपर फुटले होते. या पेपरफुटीप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी विद्यार्थी व पालकांची होती, तीही सर्वोच्च न्यायालयाने धुडकावून लावली आहे. सीबीएसई बोर्डाने निर्णय घेतल्याप्रमाणे बारावीचा अर्थाशास्त्र विषयाचा पेपर 25 एप्रिलला घेतला जाईल.

दहावीच्या गणित विषयाची फेरपरीक्षा घेतली जाणार नाही कारण, हे पेपर तपासल्यानंतर पेपरफुटीचा कोणताही प्रभाव या उत्तरांमध्ये दिसत नाही. त्यामुळे सीबीएसई बोर्डाने दहावीची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय रद्द केला.

दरम्यान बारावीच्या पेपरफुटीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. यापैकी दोन हे खाजगी शाळेतील शिक्षक आहेत. 

या पेपरफुटीच्या प्रकरणामुळे, आता शाळांना पेपरची इंक्रिप्टेड प्रत पाठवली जाईल, जी त्यांना ई-मेलद्वारे घेऊन प्रिंट करून घ्यावी व परिक्षेच्या वेळी मुलांना द्यावी, असा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला आहे. 
 

Web Title: Supreme Court dismisses all petitions related to CBSE exam paper leaks