लालूंचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला   

वृत्तसंस्था
बुधवार, 10 एप्रिल 2019

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज घेतलेल्या सुनावणीत जामीन फेटाळला. या तिन्ही प्रकरणांमध्ये लालू यांना दोषी ठरविण्यात आले आहे. लालूंच्या या अर्जावर नऊ एप्रिलपर्यंत प्रतिवाद करण्याचे आदेशही न्यायालयाने सीबीआयला दिले होते. सीबीआयने लालूप्रसाद यांच्या जामिनाला विरोध दर्शविला होता.  

नवी दिल्ली : चारा गैरव्यवहारातील तीन प्रकरणांमध्ये जामीन मिळावा यासाठी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केलेला अर्ज आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आला.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज घेतलेल्या सुनावणीत जामीन फेटाळला. या तिन्ही प्रकरणांमध्ये लालू यांना दोषी ठरविण्यात आले आहे. लालूंच्या या अर्जावर नऊ एप्रिलपर्यंत प्रतिवाद करण्याचे आदेशही न्यायालयाने सीबीआयला दिले होते. सीबीआयने लालूप्रसाद यांच्या जामिनाला विरोध दर्शविला होता.  

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांची सुटका केल्यास ते निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊन जामिनाचा गैरवापर करू शकतात, अशी शंका तपास यंत्रणेने व्यक्त केली होती. लालूप्रसाद यादव हे चारा गैरव्यवहारप्रकरणी रांचीतील बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. लालूप्रसाद यांच्या जामीन अर्जावर उत्तर देण्याची परवानगी सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्या खंडपीठाकडे 'सीबीआय'ने मागितली होती. लालू जामिनावर बाहेर आल्यास निवडणुकीच्या कामात सहभागी होऊन जामिनाचा गैरवापर करतील, अशी शंका व्यक्त केली होती. तसेही यादव हे गेल्या आठ महिन्यांपासून रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये दाखल असून, राजकीय घडामोडींमध्ये सहभाग घेत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supreme Court dismisses bail plea of Lalu Prasad Yadav in Fodder Scam