सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्व धोक्यात : न्यायाधीश कुरियन

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 एप्रिल 2018

काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सरन्यायाधीश मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर कॉलेजियमच्या शिफारसीनंतरही न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना उशीर होत आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता पुन्हा एकदा न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिले. या पत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबाबत चिंता व्यक्त केली असून, सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्व धोक्यात असल्याचे जोसेफ यांनी सांगितले. 

Supreme courts

काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सरन्यायाधीश मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर कॉलेजियमच्या शिफारसीनंतरही न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना उशीर होत आहे. या समस्येवर मार्ग काढण्याची आवश्यकता आहे, असे न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. न्यायाधीशांच्या नियुक्तीत होत असलेल्या विलंबाबद्दल जोसेफ यांनी चिंता व्यक्त केली. तसेच 'सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात कोणतेही पाऊल न उचलल्यास इतिहास आपल्याला कधीही माफ करणार नाही,' असेही जोसेफ यांनी पत्रात सांगितले. 

दरम्यान, उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ आणि वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी शिफारस कॉलेजियमने फेब्रुवारीत केली होती. मात्र, या शिफारसींचे अद्याप काहीही झालेले नाही. त्यामुळे न्यायाधीश जोसेफ यांनी अतिशय कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली.

Web Title: Supreme Court Existance in Danger says Justice Kurien