सर्वोच्च न्यायालयाचा शिक्षकांना झटका; साडेतीन लाख शिक्षकांबाबत दिला महत्त्वपूर्ण निर्णय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मे 2019

- सुमारे साडेतीन लाख शिक्षकांवर होणार या निर्णयाचा परिणाम.

नवी दिल्ली : पाटणा उच्च न्यायालयाने समान कामासाठी समान वेतन देण्याचे आंदोलक शिक्षकांच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यानंतर बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये सुमारे साडेतीन लाख कंत्राटी शिक्षकांना इतर शिक्षकांप्रमाणे समान वेतन मिळणार नाही.

बिहारमधील कंत्राटी शिक्षकांना इतर शिक्षकांप्रमाणे समान वेतन मिळावे, यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पाटणा उच्च न्यायालयाने आंदोलक शिक्षकांच्या बाजूने निर्णय दिला होता. मात्र, बिहार सरकारने याबाबत या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारच्या बाजूने निर्णय दिला आहे. 

शिक्षकांच्या या मुद्द्यावर न्यायमूर्ती उदय उमेश ललित आणि न्यायमूर्ती अभय मनोहर सप्रे यांच्या पीठाने शेवटची सुनावणी मागील वर्षी 3 ऑक्टोबरला केली होती. त्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा परिणाम बिहारमधील सुमारे साडेतीन लाख शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबावर होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supreme Court have been change 3 and half lakh contract teachers decision of the High Court