हनुमान चालिसा वाचल्यानं राजद्रोहाचा गुन्हा, SC त उचलला राणा दाम्पत्याचा मुद्दा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Supreme Court Hearing on Sedition Law

हनुमान चालिसा वाचल्यानं राजद्रोहाचा गुन्हा, SC त उचलला राणा दाम्पत्याचा मुद्दा

नवी दिल्ली : आयपीसी कलम 124A अन्वये देशद्रोह गुन्ह्याच्या (Sedition law) घटनात्कम वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court Hearing on Sedition Law) सुनावणी घेण्यात आली. यावेळी अ‌ॅटर्नि जनरल (AG) के. के. वेणुगोपाल यांनी नवनीत राणांवर आणि रवी राणांवर (Rana Couple Case) दाखल झालेल्या गुन्ह्याचा न्यायालयात उल्लेख केला. हनुमान चालिसा वाचल्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे, असं ते म्हणाले.

हेही वाचा: हनुमान चालीसा वाद : ... हा राजद्रोह कसा? जावडेकर

एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया, अरुण शौरी, माजी लष्कर अधिकारी आणि महुआ मोइत्रा यांनी देशद्रोह कलमांचा गैरवापर होत असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. याच याचिकांवर आज सुनावणी घेण्यात आली. या याचिकांवर उत्तर दाखल करण्यास केंद्राला सांगितले होते. पण, केंद्राने अद्यापही उत्तर दाखल केले नाही. उत्तर दाखल करायला उशिर का? असा सवाल न्यायालयाने एसजी तुषार मेहतांना विचारला. आम्ही दोन कारणांमुळे उत्तर दाखल करू शकलो नाही. आम्हाला योग्य वेळ दिला पाहिजे. प्रतिज्ञापत्राचा मसुदा तयार आहे, सक्षम अधिकाऱ्याची मंजुरी अपेक्षित आहे. केंद्राचे उत्तर जवळपास तयार झाले असून दोन-तीन दिवसांत प्रतिज्ञापत्र दाखल केले जाईल. यामध्ये अन्य याचिकांचाही समावेश करण्यात येणार आहे, असं तुषार मेहता यांनी सांगितलं. तसेच केंद्राकडे वेळ वाढवून मागितला. त्यानंतर केंद्राला उत्तर दाखल करण्यासाठी ९ मेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. येत्या १० मे रोजी पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे.

AG ने उपस्थित केला नवनीत राणांचा प्रश्न -

एजी के. के. वेणुगोपाल यांनी नवनीत राणा यांची बाजू मांडली. हनुमान चालिसा वाचल्याबद्दल राणा दाम्पत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना कालच जामीन मिळाला. अशा परिस्थितीत न्यायालयाने देशद्रोहाच्या कायद्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची गरज आहे. देशद्रोहावर मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची गरज आहे. देशद्रोहात कोणाला परवानगी आहे आणि कोणाला नाही हे ठरवा? याबाबतचे मार्गदर्शक तत्त्वे तयार करा, असं एजींनी म्हटलं.

Web Title: Supreme Court Hearing On Petition Challenging Sedition Law Ag Raised Navneet Rana Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top