चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजविण्याचा निर्णय मागे

Supreme Court
Supreme Court

नवी दिल्ली : चित्रपट सुरू करण्यापूर्वी चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजविणे बंधनकारक करण्याच्या आदेशात सुधारणा करत सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) हा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे आता चित्रपटगृहात राष्ट्रगीत दाखविण्याची सक्ती असणार नाही. 

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रगीत वाजविणे बंधनकारक केले होते. न्यायालयाच्या या निर्णयात सुधारणा करावी, अशी विनंती केंद्र सरकारने केली होते. केंद्र सरकारने आपल्या पूर्वीच्या भूमिकेत बदल केल्याचे दिसून आले होते. आता न्यायालयानेही आपल्या भूमिकेत बदल करत राष्ट्रगीत वाजविणे बंधनकारक नसल्याचे म्हटले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने तीस नोव्हेंबर, 2016 चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजविणे बंधनकारक केले होते; मात्र या आदेशापूर्वी असलेली स्थिती तूर्त कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालय विचार करेल, अशी आशा केंद्र सरकारने व्यक्त केली होती. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला विनंती करत मंत्री समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. या मंत्री समितीमध्ये सीमा व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त सचिव आणि विविध मंत्रालयांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. गेल्या वर्षी 23 ऑक्‍टोबरला या संदर्भात दाखल झालेल्या एका याचिकेवरील सुनावणीवेळी केंद्र सरकारने, वैविध्यपूर्ण देशातील एकात्मता वाढविण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजविणे आवश्‍यक असल्याचे म्हटले होते. सरकारने याच आपल्या भूमिकेत बदल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com