व्हॉट्‌सऍपसह केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस 

पीटीआय
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली (पीटीआय) : तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती न करणे आणि इतर भारतीय कायद्यांचे पालन न करणे आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या नियमांची पूर्तता न केल्या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज व्हॉट्‌सऍप कंपनीला दिले आहेत. 

तसेच, या प्रकरणी केंद्रालाही न्यायालयाने नोटीस पाठविली असून, आपली भूमिका स्पष्ट करण्यात सांगितले आहे. भारतातील सर्व कायदे आणि नियमांचे पालन केल्या शिवाय व्हॉट्‌सऍपला भारतात पेमेंट सेवा सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका एका संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. लोकप्रिय सोशल मीडिया ऍप असलेल्या व्हॉट्‌सऍपकडून भारतात पेमेंट सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. चार आठवड्यांच्या आत केंद्र आणि व्हॉट्‌सऍपने आपले म्हणणे न्यायालयात सादर करावयाचे आहे. 

Web Title: Supreme Court Notice to whatsapp and central government