उज्जैनमधील शिवलिंगाला 'आरओ'चे पाणी; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

वृत्तसंस्था
बुधवार, 2 मे 2018

महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या मंदिराला हिंदू धर्मात सर्वांत पवित्र मानले जाते. मंदिराच्या समितीनेही सुचवले की नियमित वापरल्या जाण्याऱ्या पाण्याने शिवलिंगाची झीज होते. हिंदू धर्मातील अनेक महाकाव्यांमध्ये भगवान शिवाने 'त्रिपुर' या राक्षसाचा वध केल्याचे लिहीले आहे. तेव्हापासून दर बारा वर्षांनी होणाऱ्या 'कुंभ मेळ्या'ची सुरवात या ठिकाणाहून झाली आहे.

उज्जैन : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनमधील महाकालेश्वर येथील शिवलिंगावर 'आरओचे' पाणी वापरण्याचा आदेश आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने दिले. आरओचे पाणी असले तरी हे पाणी मर्यादीत स्वरुपातच वापरले जावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या मंदिराला हिंदू धर्मात सर्वांत पवित्र मानले जाते. मंदिराच्या समितीनेही सुचवले की नियमित वापरल्या जाण्याऱ्या पाण्याने शिवलिंगाची झीज होते. हिंदू धर्मातील अनेक महाकाव्यांमध्ये भगवान शिवाने 'त्रिपुर' या राक्षसाचा वध केल्याचे लिहीले आहे. तेव्हापासून दर बारा वर्षांनी होणाऱ्या 'कुंभ मेळ्या'ची सुरूवात या ठिकाणाहून झाली आहे. दर बारा वर्षांनी इथे मोठी यात्रा भरवली जाते. देशभरातून लाखो भाविक या यात्रेत सहभागी होतात. येथील 'शिप्रा' नदीमध्ये स्नान करून शिवलिंगाचे दर्शन घेणे अशी प्रथा आहे.

भगवान शिवाला हिंदू धर्मातील सर्व देवांमध्ये सर्वांत शक्तिशाली आणि विध्वंसक समजले जाते. शिवाने स्वतःच जन्म घेतल्याचेही मानले जाते. या हळव्या ह्रदयाच्या देवाची उपासना करण्यसाठी कोणत्याही कठोर स्वरुपाच्या तपश्चर्या करण्याची आवश्यकता नाही. शिवाच्या 'ओम नमः शिवाय' या मंत्राचा उच्चार त्यांच्या भक्तांकडून केला जातो. एवढ्याच मंत्राने त्यांच्या ह्रदयावर विजय मिळविणे शक्य होत असल्याचे पुराण कथांमध्ये सांगितले जाते.

Web Title: supreme court order on ujjain mahakal temple use only RO water