राजदीप सरदेसाईंविरोधात 'सुओमोटो' दाखल; सुप्रीम कोर्टाच्या आदेशाविरोधातील ट्विट भोवलं

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 February 2021

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाविरोधात ट्विट केल्याने ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टाने कारवाईचा बडगा उगारला आहे. कोर्टाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत सुप्रीम कोर्टाने त्यांच्याविरोधात सुओमोटो (स्वतःहून) फौजदारी याचिका दाखल केली आहे.

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाच्या आदेशाविरोधात ट्विट केल्याने ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टाने कारवाईचा बडगा उगारला आहे. कोर्टाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत सुप्रीम कोर्टाने त्यांच्याविरोधात सुओमोटो (स्वतःहून) फौजदारी याचिका दाखल केली आहे. आस्था खुराणा यांनी यासंदर्भात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. लाईव्ह लॉ या वेबसाईटने याबाबत वृत्त दिलं आहे. 

अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सप्टेंबर 2020 मध्ये सरदेसाईंविरोधात कोर्टाचा अवमानप्रकरणी खटला सुरु करण्यास नकार दिल्यानंतर पाच महिन्यांनंतर ही याचिका दाखल करण्यात आली आहे. वेणुगोपाल याच्या नकारानंतर याचिकाकर्ते खुराणा यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेत 9 फेब्रुवारी 2021 रोजी याचिका दाखल केली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याचिकाकर्त्यांनी याचिकेत सरदेसाई यांच्या जुलै आणि ऑगस्टमधील ट्विट्सचा संदर्भ दिला आहे. कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने ऑगस्ट महिन्यांत ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांना कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी 1 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. तसेच दंड न भरल्यास तीन महिने वकिली करण्यापासून रोखण्याचे आदेश दिले होते. यावर भाष्य करताना सरदेसाई यांनी जुलै महिन्यात ट्विट केलं होतं. यामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्ट कोणालाही वकिली करण्यापासून रोखू शकत नाही असं म्हटलं होतं. सरदेसाई यांच्या या ट्विटवर याचिकाकर्त्याने आक्षेप घेत माननीय कोर्टावर अशा प्रकारचे हल्ले करणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे तर कोर्टाचा हेतूपुरस्सर केलेला अवमान आहे, असं म्हटलं होतं.

राम मंदिर देणगीवरुन कुमारस्वामी म्हणाले, नाझींनी जर्मनीत जे केलं तेच RSS करतंय

जून महिन्यात करण्यात आलेल्या ट्विटविरोधात प्रशांत भूषण यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. एका ट्विटमध्ये त्यांनी देशात अघोषित आणीबाणी लागू असल्याचं म्हणतं यामध्ये सुप्रीम कोर्टाचा सहभागाचा आणि शेवटच्या चार सरन्यायाधीशांचा उल्लेख केला होता. तर दुसऱ्या ट्विटमध्ये सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी लॉकडाउनच्या काळात आपल्या मूळगावी नागपूरमध्ये हार्ले डेव्हिडसन या सुपर बाईकवरुन फेरफटका मारल्याबद्दल भाष्य केलं होतं.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supreme Court Registers Suo Moto Criminal Contempt Case Against Rajdeep Sardesai