क्रीडा संघटनांची दारे मंत्र्यांसाठी बंद होणार?

वृत्तसंस्था
सोमवार, 5 मार्च 2018

एका जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही सूचना केली. आसाममधील भाजपचे मंत्री हिमंतविश्‍व शर्मा यांच्याकडून भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्षपद काढून घ्यावे, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल झाली होती

नवी दिल्ली - क्रीडा संघटनांमधील अधिकार पदे भूषविण्यास मंत्र्यांना बंदी घालण्यासाठी एकसमान नियम करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने भारतीय बॅडमिंटन संघटनेला केली आहे.

एका जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही सूचना केली. आसाममधील भाजपचे मंत्री हिमंतविश्‍व शर्मा यांच्याकडून भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्षपद काढून घ्यावे, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल झाली होती. तसेच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये मंत्र्यांना पदे भूषविता येत नसल्याने त्याच धर्तीवर बॅडमिंटन संघटनेचीही फेररचना करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवरील निकालावरून क्रीडा संघटनांमधील मंत्र्यांच्या उपस्थितीबाबत निर्णय होणे शक्‍य आहे.

Web Title: supreme court sports