अयोध्येला छावणीचे स्वरूप; जाणून घ्या उत्तर प्रदेशात काय घडतंय?

टीम ई-सकाळ
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

उत्तर प्रदेश राज्यात 16 हजार स्वयंसेवक तैनात, मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे त्यांच्याशी पोलिसांचा सततचा संपर्क

अयोध्या (उत्तर प्रदेश) : अयोध्येतील राम मंदिर प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत्या काही दिवसांत लागण्याची शक्यता असल्यामुळे अयोध्या आणि उत्तर प्रदेशात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच सोशल मीडियावर सायबर सेलची आणि पोलिसांची करडी नजर असल्याचे सांगण्यात आले आहे. अयोध्या शहर आणि वादग्रस्त जागेच्या परिसरात उत्तर प्रदेशातील 12 हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच उत्तर प्रदेशात इतर शहरांतही पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अयोध्या शहरात सध्या 144 कलम (जमावबंदी) लागू करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरेंनी आमदारांना काय दिला संदेश?

हे आहेत महत्त्वाचे अपडेट्स

  1. सोशल मीडियावर उत्तर प्रदेश पोलिसांची बारीक नजर, सोशल मीडियावरील कोणतिही आक्षेपार्ह पोस्ट राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत येणार
  2. अयोध्या शहरात डिसेंबर अखेरपर्यंत जमावबंदी आदेश; चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई
  3. राज्यात दहशतवादी हल्ल्यापासून इतर कोणतिही परिस्थिती हाताळण्याची तयारी असल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांचे स्पष्टीकरण
  4. अयोध्येतील सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी, महासंचालक दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्याकडे
  5. राज्यात अनेक शहरांमध्ये शांतता कमिट्यांच्या तर, गाव पातळीवरही बैठका घेण्यात येत आहेत; उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक ओपी सिंग यांची माहिती
  6. राज्यात 16 हजार स्वयंसेवक तैनात, मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे त्यांच्याशी पोलिसांचा सततचा संपर्क
  7. उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त; शाळा महाविद्यालयांमध्ये सुरक्षा रक्षकांच्या राहण्याची व्यवस्था

मुनगंटीवार म्हणतात, शिवसैनिकच होणार मुख्यमंत्री

नेते काय म्हणातात?

  1. कोणतेही वादग्रस्त विधान करू नका; उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची राज्यातील मंत्री, नेत्यांना सूचना
  2. कोर्टाच्या निर्णयाचा सर्वांनी सन्मान करावा; मायावती यांचे ट्विटवरून आवाहन
  3. भाजपकडूनही नेत्यांना सोशल मीडियावर कोणतेही आक्षेपार्ह विधान न करण्याची सूचना

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supreme court verdict on ayodhya huge security in up social media monitoring