आता मराठीतूनही मिळणार 'सर्वोच्च' निर्णय

वृत्तसंस्था
बुधवार, 3 जुलै 2019

सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यांचे निकालपत्र इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यात येत होते. मात्र, आता न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता निकालपत्र मराठी, हिंदीसह कन्नड, आसामी, उडिया, तेलुगू भाषेतही वेबसाइटवर अपलोड करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यांचे निकालपत्र इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यात येत होते. मात्र, आता न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता निकालपत्र मराठी, हिंदीसह कन्नड, आसामी, उडिया, तेलुगू भाषेतही वेबसाइटवर अपलोड करण्यात येणार आहे.

आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर इंग्रजी भाषेत निकालपत्र अपलोड करण्यात येत होते. मात्र, ते आता मराठी, हिंदी, कन्नड, आसामी, उडिया, तेलुगू भाषेत वेबसाइटवर अपलोड केले जाणार आहे. न्यायालयाने महिनाअखेरीस हिंदी आणि मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निकाल वेबसाइटवर अपलोड होतील. 

सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निर्णय हिंदीमध्ये उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात होती. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र मराठी, हिंदीसह इतर भाषेत मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supreme Court will now upload Judgements in Hindi Marathi other Regional Language