जिल्हाधिकाऱ्यांनी तरुणाच्या लगावली कानशिलात; व्हिडिओ व्हायरल

मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
 Chhattisgarh_DM
Chhattisgarh_DMGoogle file photo
Summary

जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागताच जिल्हाधिकारी शर्मा यांनी माफी मागितली. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनाही या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन नेटकऱ्यांनी केलं.

रायपूर : कोरोना महामारीला (Corona Pandemic) रोखण्यासाठी शासन, प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. लॉकडाउन (Lockdown), कर्फ्यू (Curfew) लागू करण्यात येत आहेत. पण नागरिकांकडून या नियमांचं उल्लंघन होताना दिसून येत आहे. छत्तीसगडच्या (Chhattisgarh) सूरजपूर जिल्ह्यात सध्या लॉकडाउन लागू आहे. एका तरुणाने लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी (District Collector) सदर युवकाला जोरदार कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. (Surajpur District collector slaps youth for violating lockdown in Chhattisgarh video viral)

 Chhattisgarh_DM
नवीन रुग्णसंख्या 2.5 लाखांच्या खाली, मृताची संख्या 3 लाख

जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागताच जिल्हाधिकारी शर्मा यांनी माफी मागितली. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनाही या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन नेटकऱ्यांनी केलं. याची दखल घेत मुख्यमंत्री बघेल यांनी जिल्हाधिकारी शर्मा यांची पदावरून हकालपट्टी करण्याचे आदेश दिले. रणवीर शर्मा असं या जिल्हाधिकाऱ्याचं नाव आहे. तर अमन मित्तल असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Chhattisgarh_DM
गुजरात पॅटर्न; तयार केला दीड लाखांचा मशरुम

लॉकडाउनची परिस्थिती पाहण्यासाठी जिल्हाधिकारी शर्मा शनिवारी (ता.२२) बाहेर पडले होते. त्यावेळी हा तरुण रस्त्यावरून जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चौकशी केली असता त्याने लसीकरणासाठी चाललो आहे, आजीला भेटण्यासाठी निघालो आहे, मेडिकलमधून औषधे आणायला आलो होतो, अशी उत्तरे दिली. त्यामुळे जिल्हाधिकारी शर्मांनी त्याच्याकडे प्रिस्क्रिप्शनबाबत चौकशी केली. मात्र संतप्त झालेल्या शर्मांनी तरुणाचा मोबाईल रस्त्यावर आपटला आणि त्याच्या कानशिलात लगावली.

 Chhattisgarh_DM
'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast ऐकलं का?

जिल्हाधिकारी शर्मांनी तेथे उपस्थित पोलिसांना बोलावून त्या तरुणाला शिक्षा देण्याचे आदेश दिले. पोलिसांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत त्या तरुणावर हातातील लाठीने मारहाण करण्यास सुरवात केली. हा सर्व प्रकार काही वेळातच सोशल मीडियात व्हायरल झाला. संबंधित घटनेनंतर तरुणाच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या पत्नीला औषधांची गरज असल्याने त्यांनी मुलाला घराबाहेर पाठवले होते, असं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, छत्तीसगडमध्ये ३१ मे पर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. लॉकडाउनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com