कचऱ्यातून स्टीलचा रस्ता; देशातील पहिला प्रकल्प कसा अन् कुठे साकारला?

देशात पहिल्यांदाच कचऱ्यापासून बनविला स्टीलचा रस्ता, कुठे ते वाचा सूरतमध्ये १ कोटी ९० लाख टन कचऱ्यांपासून बनविले देशातील पहिली 1 km लांब रस्ता
कचऱ्यातून स्टीलचा रस्ता; देशातील पहिला प्रकल्प कसा अन् कुठे साकारला?

आपल्या देशामध्ये दरवर्षी वेग-वेगळ्या स्टील प्लँटमधून (Surat Gujarat) कित्येक लाख टन कचरा निघतो. वेस्ट मॅनेजमेंटबाबत गंभीर असलेले केंद्र सरकार देशाच्या विकासकामांमध्ये त्याचा वापर कसा करता येईल यावर विचारमंथन करत आहे. दिर्घकाळ संशोधनानंतर गुजरातमध्ये सुरत s पायलट प्रोजेक्टतंर्गत केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विभागांनी स्टील वेस्टपासून (Steel waste)एक किलोमीटर लांबीचा रस्ता तयार केला आहे. हा रस्ता नेहमीपेक्षा मजबूत आहे. दररोज सुमारे 1 हजार ट्रक जड वजन घेऊन त्यावरून जातात.

सुरतमध्ये बांधला देशातील पहिला 1 किमी लांबीचा स्टीलचा रस्ता

गुजरातमधील सुरत शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या हाजीरा इंडस्ट्रियल एरियातील ही छायाचित्रे आहेत. येथे स्टीलचा कचरा वापरून एक किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. हा 6 लेन रस्ता तयार करताना सुरतच्या स्टील प्लांटमधील 19 दशलक्ष टन कचरा वापरण्यात आला आहे. सुरत हजीरा औद्योगिक परिसरात ज्या ठिकाणी हा पोलादी रस्ता तयार करण्यात आला आहे, तो रस्ता हाजीरा बंदराच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांमुळे पूर्णपणे खराब झाला आहे. स्टीलच्या कचऱ्याने बनलेल्या या रस्त्यावरून दररोज 18 ते 30 टन वाहतूक करणारे 1000 हून अधिक ट्रक जातात.

कचऱ्यातून स्टीलचा रस्ता; देशातील पहिला प्रकल्प कसा अन् कुठे साकारला?
एकट्या महिलेला फ्लाईटमध्ये No Entry, पुरुष सोबत हवाच: तालिबान्यांचा नवा फतवा

आधी स्टीलच्या कचऱ्यापासून बनवली खडी, मग रस्ता

स्टीलचा रस्ता बनवण्याच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर स्टीलच्या कचऱ्यापासून खडी तयार करण्यात आली आणि त्यानंतर या खडीचा वापर रस्ता बांधकामात केला गेला. या प्रयोगानंतर देशात स्वस्त आणि मजबूत रस्ते बांधले जातील. त्याचबरोबर कचऱ्याच्या ढीगांपासून सुटका होईल. पोलाद आणि नीती आयोगाच्या मदतीने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड रिसर्च (CRRI) यांनी सूरतमध्ये या प्रकल्पावर काम केले आहे. रस्तेबांधणीच्या या नव्या पद्धतीमुळे पावसाळ्यात होणारे रस्त्यांरपासून देखील संरक्षण होईल.

कचऱ्यातून स्टीलचा रस्ता; देशातील पहिला प्रकल्प कसा अन् कुठे साकारला?
Bank of Baroda मध्ये मॅनेजर पदासाठी भरती, परीक्षेशिवाय नोकरीची संधी

स्टील प्लांटमध्ये कचऱ्याचे ढीग असेच दिसतात. देशातील स्टील प्लांट्समध्ये स्टीलचा कचरा इतक्या मोठ्या प्रमाणात टाकला जातो की ''प्लांटमध्ये कचऱ्याचे डोंगर तयार होऊ लागले आहेत, जे पर्यावरणासाठी एक मोठा धोका आहे. त्यामुळेच नीती आयोगाच्या सूचनेवरून पोलाद मंत्रालयाने या कचऱ्याचा वापर करण्याचा प्रकल्प तयार केला होता.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com