विनामास्क महिलेवर कारवाईची धमकी देत पोलिसाकडून बलात्कार!

ब्लॅकमेल करत आरोपी पोलिसानं वेळोवेळी केला अत्याचार
RAPE
RAPE

सूरत : तोंडावर मास्क (mask) न लावल्यामुळे कारवाईची धमकी देत एका पोलीस कॉन्स्टेबलनं विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. यासंबंधी पीडित महिलेनं सूरतमधील उमरपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Surat Cop strips and physical abuse married woman for not wearing mask)

RAPE
शरीरासाठी सात्विक खाणं जितकं महत्त्वाचं, तेवढाच व्यायामही महत्त्वाचा;पाहा व्हिडिओ

तक्रारीत ३३ वर्षीय महिलेनं आरोप केला की, सन २०२० च्या लॉकडाउनमध्ये ती पलासना येथे आपल्या घरातून दूध आणण्यासाठी बाहेर पडली होती. यावेळी आरोपी पोलीस कॉन्स्टेबलनं तिचं अपहरण केलं. यावेळी तिनं मास्क घातलेला नसल्यानं त्याबद्दल पोलीस कारवाईची धमकी आरोपीनं तिला दिली. त्यानंतर या पोलीसानं पीडित महिलेला पोलीस ठाण्यात न नेता नवसारी रोड येथे नेलं आणि त्या ठिकाणी तिला निर्वस्त्र करुन मारहाणही केली. यावेळी आरोपी पोलिसानं तिचे निर्वस्त्र अवस्थेतील फोटो काढले आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीनं या फोटोंचा वापर करुन संबंधित महिलेला अनेकदा ब्लॅकमेल करत तिच्यावर वेळोवेळी अत्याचर केला.

RAPE
'सेना भवनाकडे वाकडी नजर करु नका एवढीच अपेक्षा'

दरम्यान, या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, "आरोपी पोलीस कॉन्स्टेबल आणि तक्रारदार महिलेमध्ये अनैतिक संबंध असावेत असं दिसतं. दरम्यान, या वादामध्ये पोलिसांनी दोघांवरही परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.

RAPE
विद्यार्थ्यांच्या जामिनाविरोधात दिल्ली पोलीस सुप्रीम कोर्टात

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, प्राथमिक माहितीतून हे समोर आलंय की, कपाडीया हा आधी पलानसा पोलीस ठाण्यात तैनात होता. पण त्याचा पीडित महिलेशी मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जानेवारीमध्ये त्याची उमरपाडा पोलीस ठाण्यात बदली झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com