विदेश सचिवांमुळे केंद्राचा खोटारडेपणा उघड

पीटीआय
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली  - लष्कराने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकबद्दल विदेश सचिव एस. जयशंकर सांगत असलेल्या माहितीमुळे केंद्रातील मोदी सरकारचा खोटारडेपणा उघड होत आहे, अशी टीका कॉंग्रेसने आज केंद्रावर केली. भाजपचा खोटारडेपणा उघड केल्याबद्दल माजी परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांच्यासारखे त्यांना पदावरून हटविले जाणार नाही, अशी आपण आशा करतो, असे कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले.
एस. जयशंकर यांनी मोदी सरकारचा फाजिल धीटपणा, मर्दानगी उघड केली आहे. अमित शहा आणि पर्रीकर यांचाही खोटारडेपणा उघड केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जयशंकर यांनी लष्कराचा खरेपणा स्पष्ट करीत भाजपचा खोटारडेपणा उघड केल्याने त्यांना माजी विदेश प्रवक्‍त्या सुजाता सिंग यांच्यासारखे पदावरून हटविले जाणार नाही, अशी आपण आशा करतो, असे ट्‌विट त्यांनी केले आहे. या सर्जिकल स्ट्राइकमध्ये लष्कराने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये विशिष्ट लक्ष्य, सीमित क्षमतेत दहशतवाद विरोधात कारवाई केली; मात्र सरकारने याबाबत प्रथमच जाहीर वाच्यता केली आहे, असे सुरजेवाला यांनी आपल्या ट्‌विटमध्ये स्पष्ट केले आहे.

Web Title: surgical strike information by s. jayshankar