सर्जिकल स्ट्राइकची पाक कबुली देत नाही, कारण...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली- युद्ध टाळण्यासाठी आणि आणखी लक्ष्यवेधी हल्ले होऊ नयेत म्हणून पाकिस्तान भारताने सर्जिकल स्ट्राइक केल्याची कबुली देत नाही, असे पाकिस्तानच्या सुरक्षातज्ञ आयशा सिद्धिका यांनी सांगितले.

भारतात सर्जिकल स्ट्राइकबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्याबद्दल आयशा सिद्धिका यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सर्जिकल स्ट्राइकला दुजोरा दिला आहे.

त्या म्हणाल्या, पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक झाल्याचे पाकिस्तानने मान्य केले तर भारताला प्रत्युत्तर द्यावे यासाठी पाकिस्तानी जनतेतून दबाव वाढतो. त्यामुळे पाक सरकार त्याची कबुली देणे टाळत आहे.

माझ्या माहितीप्रमाणे पाकिस्तानचे तीन-चार सैनिक जखमी झाले आहेत असे मला कळले, तर हार मानली असे नाही, परंतु युद्ध होऊ नये अशी पाकिस्तानला वाटते. त्यामुळे युद्ध टाळण्यासाठी पाकिस्तान या हल्ल्यांची कबुली देत नाही, असे त्यांनी सांगितले. 

Web Title: Surgical strikes in Pakistan not confess, because ...