मोदींविरोधात 'एफआयआर' दाखल करा : सुरजेवाला 

मोदींविरोधात 'एफआयआर' दाखल करा : सुरजेवाला 

नवी दिल्ली (पीटीआय) : राफेल विमानांच्या खरेदीत "दसॉल्ट एव्हिएशन' कंपनीच्या फायद्यासाठी पंतप्रधानांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी केला. मोदी यांच्याविरोधात "एफआयआर' दाखल करण्याची वेळ आली असल्याचे कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला म्हणाले.
 
भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मागणीही त्यांनी केली. सुरजेवाला म्हणाले, ""राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत भारतीय वाटाघाटी पथकाने (आयएनटी) केलेल्या अंतिम व्यवहाराकडे दुर्लक्ष करून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी पंतप्रधानांच्या वतीने यातील वाटाघाटी पूर्ण केल्या. यातून भ्रष्टाचार आणि अधिकाराचा बेकायदा वापर उघड झाला आहे.'' भाजपच्या काळात राफेल खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा कॉंग्रेसचा आरोप सरकारने फेटाळून लावला. भाजपला लक्ष्य करण्यासाठी कॉंग्रेस खोटी माहिती पसरवत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. 

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात झालेल्या वाटाघाटीपेक्षा भाजप सरकारने जास्त किंमतीने राफेलची खरेदी केली असल्याचा दावा सुरजेवाला यांनी केला. 36 विमानांचा सौदी 59 हजार कोटी रुपयांमध्ये केल्याचा सरकारचा दावा खोटा असून "एनआयटी'नुसार ही रक्कम 64 हजार कोटी असल्याचे सांगत सरकार संसदेची दिशाभूल करीत असल्याची टीका सुरजेवाला यांनी केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com