दूरदर्शनच्या कॅमेरामनसह दोन पोलिसांची नक्षलवाद्यांकडून हत्या

Survivor in Maoist attack that killed journalist and 2 cops
Survivor in Maoist attack that killed journalist and 2 cops

बस्तर : छत्तीसगडच्या बस्तर भागातील विकासकामांचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या दूरदर्शनच्या कॅमेरामनसह सुरक्षा दलाच्या दोन पोलिसांची हत्या करण्यात आली. ही घटना आज (मंगळवार) सकाळी घडली. 

नक्षलवाद्यांनी आज सकाळी बस्तर भागात हल्ला केला होता. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या दूरदर्शनच्या कॅमेरामनची ओळख पटली आहे. अचुतानंद साहु असे त्या कॅमेरामनचे नाव आहे. तसेच यामध्ये दोन पोलिसही हुतात्मा झाले आहेत. पोलिस उपनिरीक्षक रुद्रप्रताप आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मंगलू अशी त्यांची नावे आहेत. हा हल्ला बस्तर भागातील दंतेवाडा भागात सकाळी पावणेबाराच्या सुमारास झाला. या नक्षलवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती छत्तीसगडचे विशेष पोलिस महासंचालक (नक्षल कारवाई) डी. एम. अवस्थी यांनी दिली.

अवस्थींनी सांगितले, की दूरदर्शनच्या पत्रकारांची टीम दिल्लीतून या विकासकामांचे वार्तांकन करण्यासाठी दंतेवाडा परिसरात आली होती. त्यावेळी हा हल्ला झाला. या हल्ल्यात एका कॅमेरामनसह दोन पोलिस हुतात्मा झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com