आत्महत्या नसून खूनच असल्याचे एम्सच्या एका डॉक्टराचे म्हणणे 

पीटीआय
Saturday, 26 September 2020

सुशांत सिंह राजपूत यांचे मृतावस्थेतील फोटो पाहून एम्सच्या पथकातील एका डॉक्टरनी ही आत्महत्या नसून खूनचा प्रकार आहे, असे आपल्याला सांगितले होते, असा दावा सुशांत सिंह राजपूत यांचे वकिल विकास सिंह यांनी केला आहे. 

नवी दिल्ली - सुशांत सिंह राजपूत यांचे मृतावस्थेतील फोटो पाहून एम्सच्या पथकातील एका डॉक्टरनी ही आत्महत्या नसून खूनचा प्रकार आहे, असे आपल्याला सांगितले होते, असा दावा सुशांत सिंह राजपूत यांचे वकिल विकास सिंह यांनी केला आहे. 

ट्विटरवर ॲड विकास सिंह यांनी म्हटले की, एम्सच्या पथकात सहभागी असणाऱ्या एका डॉक्टरला सुशांत सिंह यांचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनी फोटो पाठवले होते. ते फोटो पाहून त्यांनी सुशांत सिंह यांचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे आपल्याला २०० टक्के वाटते आणि फोटोवरून आत्महत्या वाटत नाही, असेही सांगितले होते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या प्रकरणाचा तपास करणारे सीबीआय मात्र आत्महत्येचे प्रकरण हत्येमध्ये बदल करुन घेण्यास विलंब करत असल्याने आपण निराश झालो आहोत, असेही विकास सिंह यांनी नमूद केले. १४ जून रोजी वांद्रे येथे ३४ वर्षीय सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या घरीच गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता. सुशांत सिंह याने आत्महत्या केली की खून केला, याबाबतचे गूढ अद्याप कायम आहे. याप्रकरणी सुरवातीला मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) दाखल केला होता. त्यानंतर २५ जुलै रोजी सुशांत यांच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती, तिचे आई वडिल इंद्रजित आणि संध्या, भाऊ शोविक आदींविरुद्ध तक्रार केली. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh case AIIMS doctor said it was not suicide but murder