सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आता केंद्र सरकारची उडी; सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 7 August 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput)आत्महत्या प्रकरणात सातत्यानं नवीन नवीन काही घडत आहे. आज, सकाळी याप्रकरणात अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची अंमलबजावणी संचालनालयानं चौकशी केली. प्रकरणाच्या तपासावरून महाराष्ट्र पोलिस-बिहार पोलिस वाद सुरूच आहे. त्यात आता केंद्र सरकारने उडी घेतलीय. केंद्राने सुप्रीम कोर्टात (Supreme Court)पक्षकार होण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली - अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput)आत्महत्या प्रकरणात सातत्यानं नवीन नवीन काही घडत आहे. आज, सकाळी याप्रकरणात अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची अंमलबजावणी संचालनालयानं चौकशी केली. प्रकरणाच्या तपासावरून महाराष्ट्र पोलिस-बिहार पोलिस वाद सुरूच आहे. त्यात आता केंद्र सरकारने उडी घेतलीय. केंद्राने सुप्रीम कोर्टात (Supreme Court)पक्षकार होण्याची मागणी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रिया चौकशीसाठी हजर
केंद्राने आज सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करून पक्षकार होण्याची मागणी केली. त्यामुळं या प्रकरणात मुंबई पोलिस अर्थात महाराष्ट्र सरकार, बिहार पोलिस, सीबीआय आणि आता केंद्र सरकार इतक्या संस्था एकत्र येत आहेत. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर सुशांतकडून पैसे उकळल्याचा आरोप केल्यानंतर रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू झाली आहे.

सत्य नव्हे, राजपूत मते महत्त्वाची

तिच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यासाठी अंमलबजाणी संचालनालयानं तिला नोटीस पाठवली होती. ही चौकशी टाळण्याचा रियाचा प्रयत्न होता. पण, आज सकाळी ती अचानक ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली. सुशांतकडून रियाने 15 कोटी रुपये घेतल्याचा आरोप, सुशांतच्या वडिलांनी केलाय. आज, सकाळी रिया ईडी कार्यायात हजर झाल्यानंतर तिचे वकील सतीश मानशिंदे यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'रिया कायदा पाळणारी मुलगी आहे. रियाने ईडी चौकशी टाळण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा मीडिया करत आहे. पण, तसे झालेले नाही. रिया चौकशीसाठी वेळेवर हजर झाली आहे.' 

सुशांतसिंह मृत्यु प्रकरण; सीबीआयतर्फे रियाविरोधात गुन्हा दाखल

विनय तिवारी मुंबईतून रवाना
दरम्यान, बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबईतून क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आलं. तिवारी मुंबई विमानतळावरून थेट पाटण्याला गेले आहेत. तत्पूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यात त्यांनी मी मुंबईतून चांगल्या आठवणी घेऊन जात आहे, अशी प्रतिक्रिया दिली. बिहार पोलिसांना या प्रकरणात जे काही सापडले आहे, ते सुप्रीम कोर्टात जमा केले आहे, असेही तिवारी यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput case center files petition supreme court