सुशील मोदींचे अस्थानांशी लागेबांधे ; वर्मांच्या खुलाशाने खळबळ

सुशील मोदींचे अस्थानांशी लागेबांधे ; वर्मांच्या खुलाशाने खळबळ

पाटणा : केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) अंतर्गत संघर्षामुळे आता बिहारमधील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. या सर्वोच्च तपास संस्थेचे संचालक आलोक वर्मा यांनी केंद्रीय दक्षता आयोगाला (सीव्हीसी) दिलेल्या माहितीमुळे बिहारमध्ये भाजपची चांगलीच कोंडी होऊ शकते.

बिहारमधील भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांचे सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याशी लागेबांधे होते. रेल्वे गैरव्यवहारात लालूंना अटक करण्यात यावी, यासाठी मोदींनी अस्थाना यांच्याकडे आग्रह धरला होता, अशी माहिती वर्मा यांनी आयोगाला दिली आहे. यावर भाष्य करताना राष्ट्रीय जनता दलाचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी म्हणाले की, आलोक वर्मा यांचा खुलासा लक्षात घेता लालूंना कारस्थान करून चौकशीच्या जाळ्यात फसविण्यात आले. या प्रकरणात सीबीआयकडे कोणतेही ठोस पुरावे नव्हते. केवळ राजकीय सूडापोटी लालूप्रसाद आणि त्यांच्या कुटुंबीयांना फसविण्यात आले. 

लोकांमध्ये जाणार 

लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लालूंचा पक्ष याच मुद्याचे भांडवल करण्याची शक्‍यता आहे. आम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांना भाजपचे कारस्थान समजावून सांगू. पशुखाद्य गैरव्यवहारात देखील लालू जातीयवादाचे बळी ठरले असेही तिवारी यांनी नमूद केले. भविष्यात केंद्र सरकारकडून सीबीआयच्या होणाऱ्या गैरवापराचा मुद्दा राष्ट्रीय जनता दलाकडून लावून धरला जाऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com