परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज 'एम्स' रुग्णालयात दाखल

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर "एम्स' रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना मधुमेह असून, छातीत दुखायला लागल्याने सोमवारी (ता. 7) रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे सांगण्यात आले.

हृदयरोग तज्ज्ञांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. या वर्षी एप्रिल महिन्यातही सुषमा स्वराज यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष एस. वाय. कुरेशी यांनी त्यांना लवकर बऱ्या होण्यासाठी ट्‌विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. माझ्या कारकिर्दीत तीन वेळा त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. या सर्वोत्कृष्ट मंत्री आहेत, असेही कुरेशी यांनी म्हटले आहेत.

Web Title: Sushma Swaraj admitted to AIIMS